डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाणे संशोधन केलेल्या धानाच्या जातींची लागवड करावी – कृषि विज्ञान केंद्र, साकोली “ पंदेकृवि बियाणे दिवस” कार्यक्रम संपन्न

कृषि विज्ञान केंद्र साकोली व कृषि संशोधन केंद्र, साकोली यांचे संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथे “पंदेकृवि बियाणे दिवस” या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४.०६.२०१९ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. यादवरावजी मेश्राम, कृषिभूषण शेतकरी, लवारी तहसील-साकोली तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जी. आर. शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, कृषि संशोधन केंद्र, साकोली, श्री. पी. पी. पर्वते, विषय विशेषज्ञ, विस्तार शिक्षण, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, डॉ. बी.एन. चौधरी, सहाय्यक प्राध्यापक, कृषि कीटकशात्र, कृषि संशोधन केंद्र, साकोली, श्री. एस.एस. शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र, कृषि संशोधन केंद्र, साकोली, तसेच श्रीमती. सविता तिडके, तालुका अभियान व्यवस्थापक, पं. सं. लाखनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून करण्यात आली.

श्री. पी. पी. पर्वते, विषय विशेषज्ञ, विस्तार शिक्षण, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यात त्यांनी “पंदेकृवि बियाणे दिवस” कार्यक्रमाच्या आयोजन उद्देश बाबत माहिती दिली   व “डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाणे संशोधन केलेल्या आणि कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत विक्री असलेल्या धानाच्या विविध जातीविषयी माहिती देऊन, हे सर्व वाण स्वस्त आणि उच्य प्रतीचे असल्याने शेतकर्यांनी या जातींचा  जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले. तसेच कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत असलेल्या सुविधाबाबत माहिती देऊन त्यांनी शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात धान पिक लागवड तंत्रध्यानाचा अवलंब करून जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवावा असे आवाहन केले.

डॉ. जि. आर. शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, कृ.सं. केंद्र, साकोली यांनी धानाच्या कीड व रोग प्रतिकारक वाणाचा वापर करावा जेणेकरून कीड-रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल असे प्रतिपादन केले. धानाच्या विविध वाणांची माहिती देऊन, धानाची पेरणी गादीवाफ्यावर करावी जेणेकरून पावसाच्या पाण्याच योग्य व्यवस्थापन करता येईल, बदलत्या हवामानाचा विचार करता कमी कालावधीच्या वाणांचा वापर करावा असे सांगितले तसेच कृषि संशोधन केंद्र साकोली ने नुकतीच संशोधित केलेली धानाची लाल तांदूळ असलेली जात एस.के.एल.-आर.आर.-१ बददल माहिती दिली.

डॉ. बी. एन. चौधरी, कीटक शास्त्रज्ञ, यांनी धान पिकावरील प्रमुख किडी व त्यांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले तर श्री. एस.एस. शिंदे, रोग शास्त्रज्ञ यांनी धान पिकावरील रोग व त्यावरील  व्यवस्थापनाकरीता  बीजप्रक्रियेचे महत्व याविषयी माहिती दिली.

या प्रसंगी श्री. यादवराव मेश्राम, कृषि भूषण शेतकरी, लवारी, यांचा कृषि विज्ञान केंद्र, साकोली कडून  शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार  करण्यात आला तसेच श्री. सुरजकुमार लांजेवार, मिन्सी, तहसील-पवनी, यांना नुकतीच विदयापीठ निर्मित एस.के.एल.-आर.आर.-१ हे वाण वितरीत करून बियाणे विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. यादवरावजी मेश्राम यांनी धान शेतीमध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर न करता योग्यरीत्या व्यवस्थापन केल्यास कीड व रोगांपासून होणारे नुकसान टाळता येऊ शकते तसेच उगवनपूर्व तणनाशकांचा वापर धान रोवनिनंतर २४ तासात केल्यास तणांचे प्रभावी व्यवस्थापन करता येऊ शकते असे सांगितले. याव्यतिरिक्त शेतकर्यांनी केवळ धान पिकांवर अवलंबून न राहता फळपिके, भाजीपाला पिकांचीसुद्धा लागवड करून आपली प्रगती साधावी असे आवाहन उपस्थित  शेतकऱ्यांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. के. लाकडे, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या यांनी केले तर आभार श्री. वाय. आर. महल्ले, विषय विशेषज्ञ, कृषि अभियांत्रिकी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  डॉ. प्रवीण खिरारी, विषय विशेषज्ञ, श्री. कपिल गायकवाड, कार्यक्रम सहायक, संगणक, श्री. सुनील साबळे, प्रशेत्र व्यवस्थापक, श्री. गणेश गुसिंगे, कु. आशा इडोळे, गीता बोरकर यांचे सहकार्य लाभले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *