डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजित शिवार फेरीचा भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : डॉ. उषा डोंगरवार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला स्थापना दिवसाचे औचित्य साधून यावर्षी विद्यापीठ शिवार फेरी दिनांक २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून जिल्हानिहाय कार्यक्रम सुनिश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १ ऑक्टोबर २०२३ ला शिवार फेरीचे नियोजन आहे. या शिवार फेरी तसेच पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी, संशोधक, धोरण करते आणि उद्योग भागधारकांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी अत्याधुनिक कृषी पद्धती बद्दल जाणून घेण्यासाठी आणि शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतीची खात्री करून पीक उत्पादकता वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे असे असून या तीन दिवसीय शिवार फेरीमध्ये विविध वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा समावेश असणार आहे. प्रत्याक्षिकामध्ये २२० प्रगत खरीप पिक उत्पादन तंत्राचे २० एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट प्रात्यक्षिक असणार आहे. यामध्ये तृणधान्य, कडधान्य, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, फळपिके, फुलपिके, चारा पिके, धान पिके आणि त्यांचे तंत्रज्ञान त्यासोबतच १६ खाजगी कृषी निविष्ठा कंपन्यांची थेट प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे. विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागाचे ११०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शिवार फेरी दरम्यान कृषी क्षेत्रा समोरील आव्हाने आणि संधी यावर चर्चासत्राचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.

          करिता भंडारा जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींना विनंती करण्यात येते की, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित शिवार फेरी मध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त कृषी तंत्रज्ञान  चा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, साकोली तर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *