शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठ निर्मित वाणांचा अवलंब करावा डॉ. एन.एस. वझिरे “किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न”

शेतकरी बंधूनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठअंतर्गत प्रसारित विविध वाणांचा अवलंब तसेच धान शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन डॉ . एन.एस. वझिरे कार्यक्रम समन्वयक ,कृषि विज्ञान केंद्र, साकोली  यांनी केले ते कृषि विज्ञान केंद्र साकोली (भंडारा) अंतर्गत आयोजित किसान गोष्टी कार्यक्रमात बोलत होते.

कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांच्या वतीने दि. ३१ मे २०१९ रोजी किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला मा. डॉ. एन.एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली,श्री. पि.पि. पर्वते, शास्त्रज्ञ,कृषि विस्तार, श्री. वाय. आर. महल्ले, शास्त्रज्ञ कृषि अभियांत्रिकी,डॉ.पि.बी. खिरारी, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र,श्री.एस.के लाकडे, शास्त्रज्ञ,उद्यानविद्या तथा इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर कर्यक्रमात डॉ . एन.एस. वझिरे यांनी शेतकऱ्यांना धान व तूर बीज प्रक्रिया करिता जैविक व रासायनिक कीटकनाशके यांच्या वापरा बाबत माहिती दिली.

श्री. पि.पि. पर्वते , शास्त्रज्ञ,कृषि विस्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विद्यापीठअंतर्गत प्रसारित विविध तूर व धान पिकांच्या सुधारित वाणांची तसेच माती नमुना घेण्याची पद्धत व माती परीक्षणाचे महत्व या बाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देवून शेतकऱ्यांचे अनुभव कथन केले,तसेच उपस्थितांना माती परीक्षण करून पिकांमध्ये खत व्यवस्थापन करावे असे आवाहन केले .

 श्री. वाय. आर. मह्हले, शास्त्रज्ञ, कृषि अभियांत्रिकी यांनी उपस्थितांना धान पेरणी यंत्र व इतर औजारे विषयक माहिती दिली ,तसेच डॉ. पि. बी. खिरारी, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व  दुग्धशास्त्र यांनी विविध चारा पिके व आझोला  याची माहिती देवून लागवड करण्याकरीता आवाहन केले. श्री.एस.के लाकडे, शास्त्रज्ञ,उद्यानविद्या यांनी विविध भाजीपाला पिके व त्यावरील कीड व रोग व्यवस्थापन या बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाला उमेद अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील  १२० कृषि सखी,पशु सखी व इतर शेतकरी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *