भंडारा जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण बाब म्हणून शिंगाडा लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा उद्देश भंडारा जिल्ह्यात उपलब्ध खोल बांध्या, तलाव व बोड्या मध्ये शिंगाडा लागवड क्षेत्र वाढविणे व खरीप धान पिकापेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न मिळवणे, तयार होणाऱ्या शिंगाडा वर प्रक्रिया करून शिंगाडा पीठ व इतर पदार्थ तयार करणे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे धानाच्या खोल बांधी, बोडी, तलाव उपलब्ध आहेत त्यांनी या पिकाकडे वळावे. या पिकाचा जीवनक्रम जाणून घ्यावा, उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर करावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, साकोली तर्फे करण्यात आले आहे. शिंगाडा पिकाची बिजाई, व्यवस्थापन, काढणी कीड व रोग इत्यादी सर्व विषयांवर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तरी इच्छुक शेतकरी यांनी कृषी विज्ञान केंद्र, साकोली कडे नोंदणी करावी. येत्या खरीप हंगामात काही क्षेत्रावर खरीप धानला पर्यायी पीक म्हणून शिंगाडा पीक लागवड करावी. अधिक माहिती करिता संपर्क ९४०३६१७११३ वर संपर्क करावा.