डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा तर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी कार्यक्रमाचे थेट प्रसारण आयोजनकृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारायेथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमा अंतर्गत मा. प्रधानमंत्री, भारत सरकार यांचे शुभ हस्ते शनिवार दिनांक ०२ ऑगस्ट २०२५रोजी सकाळी ११ वाजता उत्तरप्रदेश मधील वाराणशी येथे आयोजित प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २० वा हफ्ता हा देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी रक्कम ही ऑनलाईन वितरीत करण्यात येणार आहे.
सोबतच मा. प्रधानमंत्री, भारत सरकार, काही निवडक शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत तसेच मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा अंतर्गत सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच उपस्थित शेतकरी बंधूकरिता खरीप हंगामातील प्रमुख पिकांवरील मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त शेतकरी, महिला शेतकरी, ग्रामीण युवक, युवती यांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. उषा डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा यांच्या कडून करण्यात आले आहे.