डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने “ॲग्रोटेक २०२४’’ या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनाचे तीन दिवस, दिनांक २७ ते २९ डिसेंबर, २०२४ दरम्यान क्रीडांगण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी नगर, अकोला येथे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन होणार असून प्रदर्शनी सकाळी १०.०० ते रात्री ०८.०० पर्यंत सुरू राहणार असून दुपारी २ ते ४ दरम्यान चर्चासत्राचे दररोज आयोजन होणार आहे. दिनांक २९ तारखेला सकाळी ११.०० वाजता समारोप कार्यक्रम राहील. या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीचे वैशिष्ट्ये कृषी विद्यापीठ व सलग्न कृषी संस्थांची दालने, विद्यापीठ शास्त्रज्ञां सोबत विविध विषयावर दररोज चर्चासत्र, कृषी अवजारे व उत्पादनांची दालने, कृषी व कृषी सलग्नित योजनांची माहिती, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची दालने, मत्स्यव्यवसाय विभागाची दालने, कृषी व ग्रामीण उद्योग दालने, फुल, फळे व भाजीपाला प्रदर्शन, बचत गटांचा सहभाग विद्यापीठ प्रकाशनांचे दालन राहणार आहे. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीच्या निमित्ताने कृषी तंत्रज्ञानाचा जागर होत असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या “ॲग्रोटेक २०२४” राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, साकोली यांनी केला आहे.