जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन करून जमिनीची सुपीकता वाढवावी: डॉ. उषा डोंगरवार

०५ डिसेंबर हा दिवस जागतिक पातळी वर जागतिक मृदा दिवस म्हणून संपन्न होत आहे, दिनांक ०५ डिसेंबर २०१४ रोजी जागतिक मृदा दिवसाची सुरुवात करण्यात आली असून २०२३ वर्षमाती व पाणी- जीवनाचे स्त्रोत या संकल्पनेवर आधारित आहे. याच अनुषंगाने पारिजात इंडिया प्रायवेट कंपनी व कृषी विज्ञान केंद्र,साकोली (भंडारा) यांच्या संयुक्त विद्यमानेकृषी विज्ञान केंद्र,साकोली येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचेअध्यक्षडॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ  शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी  विज्ञान केंद्र,साकोली(भंडारा),कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निनाद कोरडे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग साकोली, अतिथी श्री, एम आर ढीमुळे रेशीम विकास अधिकारी भंडारा, कार्यक्रमाचे अतिथी डॉ. नितीन तुरस्कर, श्री. ताराचंदजी लंजे कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत उंबरकर वि. वि. कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र,साकोली (भंडारा), श्री. गौरवसाल्पीकर पारिजात इंडिया प्रायवेट कंपनीचे प्रतिनिधी, श्री. दिनेश मेंढे पारिजात इंडिया प्रायवेट कंपनीचे प्रमुख (भंडारा विभाग)तसेच कृषी  विज्ञान केंद्र,साकोलीयेथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच भंडारा जिल्ह्यातील ७५ प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

            कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. योगेश महल्ले वि. वि.कृषी अभियांत्रिकी यांनी केले. यामध्ये त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीचानमुना कसा घ्यावा तसेच माती परीक्षणाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.निनाद कोरडे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग साकोलीयांनी पशुसंवर्धन विभागामार्फत सुरु असणाऱ्या राष्ट्रीय पशुसंवर्धन मिशन, स्मार्ट अशा अत्यंत महत्वपूर्ण शेती पूरक योजनांची माहिती दिली व  शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.श्री.एम आर ढीमुळेरेशीम विकास अधिकारी भंडारा यांनी रेशीमशेती लागवड तंत्रज्ञान याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाचे अतिथी डॉ. नितीन तुरस्कर यांनी शेतीमधील आपले अनुभव कथन करून मधमाशीपालन व्यवसायाचे महत्व, मधमाशीपालनाद्वारे परागीकरणामुळे वाढणारे उत्पादन तसेच जीवनात शेतीविषयक नोंद वहीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर पारिजात इंडिया प्रायवेट कंपनीचे प्रतिनिधीश्री. गौरव साल्पीकर यांनी पारिजात इंडिया प्रायवेट कंपनीचे उत्पादके यांची सविस्तर माहिती दिली. कीटकनाशक फवारतांना घ्यावयाची काळजी, विषबाधा होऊ नये व झाल्यास करावयाचे उपाय योजना यावर सादरीकरण केले. श्री. दिनेश मेंढे पारिजात इंडिया प्रायवेट कंपनीचे प्रमुख (भंडारा विभाग) यांनी धान व मका लागवड तंत्रज्ञान विषयीउपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत उंबरकर वि. वि. कीटकशास्त्र कृषी  विज्ञान केंद्र,साकोली यांनी बियाणे साठवणूक मधील किडींचे व्यवस्थापण यावर सादरीकरण केले.कार्यक्रमाचे अतिथी श्री. ताराचंदजी यांनी १२ व्या शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमासंबंधीबोलतांना ते  म्हणाले की, हा कार्यक्रमातील विषय शेतकरी हिताचे असून त्यांना त्याचा फायदा होत आहे.

            याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ  शास्त्रज्ञ  व प्रमुख कृषी  विज्ञान केंद्र,साकोली (भंडारा) यांनीजमीन सुपीक असेल तर रोग कमी व रोग कमी तर उत्पादन जास्त असे समीकरण आहे. जमीन सुपीकतेसाठी शेतातील तणीस, कडीकचरा व पालापाचोळा यांचा वापर करा. शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन सारखे शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे आहे.रासायनिक खताचा अतोनात वापर झाल्याने जमिनीची सुपीकता कमी होत आहे.रब्बी हंगामातील पिक व्यवस्थापन, जमिन आरोग्य पत्रिकेनुसार जर खत व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.

            याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांपैकी काही निवडक शेतकऱ्यांना मृद परीक्षण आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आल्या. तसेच पारिजात इंडिया प्रायवेट कंपनीमार्फत कीटकनाशक फवारणी करतांना घालावयाची सुरक्षा किट सुद्धा वितरीत करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री. प्रमोद पर्वते, वि. वि.कृषी  विस्तार यांनी तर आभार डॉ. प्रवीण खिरारी वि. वि.पशुसंवर्धन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कु, कांचन तायडे, श्री.लयंत अनित्य,श्री. कपिल गायकवाड,श्री.सोमनाथ गवते,श्री. मुकेश सुखदेवे,कु. आशा इडोळे, यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *