कंपोस्ट खत निर्मिती विषयावर किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन  

स्वच्छता उपक्रमाचा भाग म्हणून शेतातील केरकचरा,झाडांचा पालापाचोळा, काडीकचरा, स्वयंपाकघरातील निरुपयोगी घटक, जनावरांच्या गोठ्यातील शेण व मलमूत्र या सर्व सेंद्रिय पदार्थांपासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली दि. ०८.०४.२०२५ रोजी किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथील विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतामधील व शेताच्या अवतीभोवती उपलब्ध असलेल्या  सेंद्रीय पदार्थांचा वापर करून कंपोस्ट खत तयारकरावे. तसेच त्याचा वापर शेतामध्ये करावा जेणेकरून रासायनिक खतकमी प्रमाणात वापरले जाईल व त्यामुळेशेतकऱ्यांना त्यावरील होणाऱ्या खर्चात बचत होऊ शकतेयाबाबत मार्गदर्शन केले.

कंपोस्ट खत तयार करण्याकरिता सेंद्रिय पदार्थाचे विघटन होणे गरजेचे असते. याकरिता जैविक विघटक म्हणजेच बायोडीकंपोझरचा वापर केल्यास सेंद्रिय पदार्थाचे अवशेष लवकर कुजण्यास मदत होते. यामध्ये कंपोस्ट खत निर्मिती करिता एक टन सेंद्रिय पदार्थाचे विघटन करण्यासाठी एक किलो जैविक विघटकाची आवश्यकता लागत असून येणाऱ्या खरीप हंगामात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कंपोस्ट खताची गरज लक्षात घेता त्याप्रमाणे जास्तीत जास्त तयार करून त्याचा शेतामध्ये वापर करावा याबाबत माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमाकरिता पापडा खु. गावातील सर्व शेतकरी महिला शेतकरी व कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथील अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *