महीला शेतकरी मेऴावा, कृषि प्रदर्शनी आणि चर्चासत्र

दि.29/06/2019 ऱोजी शनिवारला ठीक 11.00 वाजता  कृषी विज्ञान केंद्र,साकोली , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) ,भडारा, स्मार्ट व्हीलेज डेवलपमेंट सोसायटी ,साकोली, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, भंडारा, रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा भंडारा,व कोरोमंडल फर्टिलायझर ग्रुप नागपूर व मॉडेल ऍग्रो इक्विपमेंट्स कुबोटा ट्रॅक्टर, भंडारा-गोंदिया याच्या संयुक्त विद्यमाने भारत सभागृह,नागझिरा रोड, साकोली या ठिकाणी महीला शेतकरी मेऴावा, कृषि प्रदर्शनी आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाला उदघाटक म्हणून मा. श्री. सुनीलजी मेंढे, खासदार, भंडारा- गोंदिया. मा.श्री. राजेशजी काशिवार, आमदार, साकोली विधानसभा क्षेत्र, मा. श्री. शांतनू गोयल, जिल्हाधिकारी, भंडारा, मा. श्री. रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, जी.प, भंडारा, मा. डॉ. डी. एम. मानकर, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, मा. उषा डोंगरवार, सभापती, पंचायत समिती, साकोली, मा. धनवंताताई राऊत, नगराध्यक्ष, नगर परिषद, साकोली, मा. हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा, श्रीमती. मनीषा कुळसुंगे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा यांचेसह जिल्ह्यातील इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच सदर मेळाव्यात जिल्ह्यातील कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी महिलांचा सत्कार होणार आहे.

तरी सर्व शेतकरी बंधू व महीला बघिनींना विनंती करण्यात येते की, त्यांनी या कार्यक्रमासाठी  आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती डॉ . निलेश वझिरे  कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र, साकोली(भंडारा)यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *