महिला सशक्तीकरणाकरिता बचत गटांचे योगदान महत्त्वाचे- मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार,भंडारा -गोंदिया

            खरीप हंगाम महीला शेतकरी मेऴावा, कृषि प्रदर्शनी आणि चर्चासत्र कार्यक्रम संपन्न

   महिला सशक्तीकरनाकरिता महिला बचत गटाचे योगदान अतिशय महत्वाचे असून महिलानी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन आपला सर्वांगीण विकास साधावा, यामध्ये केद्र शासनामार्फत महिला सशक्तीकरनासंबंधित विविध योजना सुरु करण्यात आल्या असून त्यामधून महिलांनी  कौशल्य विकास साधावा तसेच कृषि क्षेत्रात शेतकऱ्यांनी नवीन तंत्रद्यानाचा वापर करून  कृषि पूरक व्यवसायाच्या व कृषि वर आधारित उद्योगाच्या  माध्यमातून, प्रक्रिया व मूल्यवर्धन करून आर्थिक नफा मिळवावा, राज्य शासन व केंद्र  शासन शेतकऱ्यांच्या सोबत आहेत, असे प्रतिपादन मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार, भंडारा -गोंदिया यांनी  केले ते कृषी विज्ञान केंद्र, साकोली, तर्फे भारत सभागृह, नागझिरा रोड, साकोली या ठिकाणी आयोजित “महीला शेतकरी मेऴावा, कृषि प्रदर्शनी आणि चर्चासत्रात” बोलत होते.  

कृषि विज्ञान केंद्र, साकोली, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) ,भंडारा, स्मार्ट व्हीलेज डेवलपमेंट सोसायटी ,साकोली, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, भंडारा, रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा भंडारा,व कोरोमंडल फर्टिलायझर ग्रुप नागपूर व मॉडेल ऍग्रो इक्विपमेंट्स कुबोटा ट्रॅक्टर, भंडारा-गोंदिया याच्या संयुक्त विद्यमाने दि.29/06/2019 ऱोजी शनिवारला भारत सभागृह, नागझिरा रोड, साकोली या ठिकाणी “महीला शेतकरी मेऴावा, कृषि प्रदर्शनी आणि चर्चासत्र” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर कार्यक्रमाला २५६३ शेतकरी महिला उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. श्री. सुनीलभाऊ मेंढे, खासदार, भंडारा -गोंदिया,  कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजेश काशीवार, आमदार, साकोली, प्रमुख अतिथी मा. उषाताई डोंगरवार, सभापती, पंचायत समिती, साकोली  मा. वर्षाताई कापगते, उपसभापती, पंचायत समिती, साकोली .मा. जयश्रीताई पर्वते, पंचायत समिती सदस्य, साकोली, मा. बाळाभाऊ अंजनकर, मा. रामचंद्रजी कापगते, कृषिभूषण शेतकरी, खंडाळा, मा. शेषरावजी निखाडे, कृषिभूषण शेतकरी, सेलोटी, मा. यादोरावजी मेश्राम, कृषिभूषण शेतकरी, लवारी, मा. डॉ. एन. एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, मा. डॉ. जी.आर. श्यामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, कृषि संशोधन केंद्र, साकोली, मा.श्री.प्रकाशजी बाळबुद्धे, सचिव, स्मार्ट व्हीलेज डेवलपमेंट सोसायटी ,साकोली, मा. श्री. राजेंद्र इंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद, भंडारा, श्री. धम्मदिप गोंडाणे, स. का. अ, रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा भंडारा, श्री. पि.पि. गीदमारे, तालुका कृषि अधिकारी, साकोली यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.     

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजेश काशीवार, आमदार, साकोली यांनी महिला बचत गटांनी संघटीत होऊन, मेहनत करून व कृषि आधारित प्रशिक्षणे घेऊन स्वतःचा  आणि स्वतःच्या परिवाराचा आर्थिक विकास साधावा असे सांगितले तसेच  महिलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असून त्या जोरावर त्या अडचणींवर मात करून पाहिजे ती गोष्ट साध्य करू सकतात, राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून महिलांनी स्वताच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन, कौसल्य विकसित करून विकास साधावा असे प्रतिपादन केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एन. एस. वाझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले त्यामध्ये त्यांनी कृषि विज्ञान केंद्र साकोली अंतर्गत असलेल्या सुविधा आणि कार्य याबाबत माहिती देऊन कार्यक्रमाचे उद्देश आणि रूपरेषा सांगितली.

            सदर कार्यक्रमात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरिता मा. संजीवनीताई चांदेवार, गोंडउमरी तसेच मा. हिराबाई हटवाडे, बरडकिन्ही यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच कृषि कार्यानुभव विद्यार्थी, कृषि महाविद्यालय नागपूर यांनी कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी व शेतकरी आत्महत्या उपाय या विषयावर पथनाट्य सादर केले तसेच  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलानी सुद्धा कृषि वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

            कृषि प्रदर्शनी मध्ये कृषि विज्ञान केंद्र, साकोली, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) ,भंडारा, कृषि संशोधन केंद्र, साकोली, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला बचत गटांचे ९ दालन, रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा भंडारा,व कोरोमंडल फर्टिलायझर ग्रुप नागपूर व मॉडेल ऍग्रो इक्विपमेंट्स कुबोटा ट्रॅक्टर, भंडारा-गोंदिया, कापगते फोर्स ट्रॅक्टर, साकोली यांचेसह इतर विभागांचे कृषि प्रदर्शनी दालन लावण्यात आले होते.

               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद पर्वते, विषय विशेतज्ञ , कृषि विस्तार तर आभार प्रदर्शन श्री. सूचित लाकडे, विषय विशेतज्ञ, उद्यानविद्या, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कृषि विज्ञान केंद्र, साकोली मधील अधिकारी/कर्मचारी, कृषि कार्यानुभव विद्यार्थी, कृषि महाविद्यालय नागपूर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *