मधुमक्षिका पालन ग्रामीण युवक-युवती यासाठी सुवर्णसंधी – डॉ. उषा आर. डोंगरवार

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, भंडारा आणि कृषि विज्ञान केंद्र, भंडारा (साकोली) यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालन जनजागृती मेळावा कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, भंडारा (साकोली) येथे करण्यात आले.

          या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. गणेश तईकर, जिल्हा अग्रणी प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, भंडारा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भुवनेश्वर शिवणकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, भंडारा, डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विद्यान केंद्र, साकोली, श्री. सि. बी. देविपुत्र, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळ, भंडारा त्याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. रवींद्र जोगी, मधमाशा पालन तज्ञ, वरोरा, चंद्रपूर, श्री. पि. के. आसोलकर, मधपर्यवेक्षक, खादी ग्रामोद्योग, भंडारा हे उपस्थित होते.

          या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आली. यानंतर कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सि. बी. देविपुत्र यांनी केले यात त्यांनी मधुमक्षिका पालन हा शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन सुरुवात करावी असे आवाहन केले.

          श्री. भुवनेश्वर शिवणकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन व्यवसायाकरिता शासनाच्या योजना तसेच उद्योग सुरु करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी तसेच योजनेचा लाभ घेणेकरिता आवश्यक कागदपत्रे , परगीभवानासाठी मधुमक्षीकापालनाचे महत्व  बाबत माहिती दिली.

          श्री. गणेश तईकर यांनी या व्यवसायासाठी उपलब्ध बँक योजना, बँकची उद्दिष्ट्ये व कार्य बद्दल  आवश्यक माहिती दिली.

          श्री. पि. के. आसोलकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मधमाशीचे प्रकार यामध्ये राणीमाशी, कामकरी माशी यांचे कार्य, व्यवसायाकरिता लागणारे  आवश्यक साधनसामुग्री याबाबत सादरीकरण करून मार्गदर्शन केले.

          श्री. रवींद्र जोगी यांनी मधुमक्षिका पालन या व्यवसायाकरिता शासनाकडून अनुदानावर मधपेट्या शेतकरी किंवा शेतकरी गटांना मिळू शकतात तसेच शेतकरी एकत्रित येऊन सुद्धा हा व्यवसाय सुरु  केल्यास हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.  

          डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विद्यान केंद्र, साकोली यांनी उपस्थित शेतकरी विशेषकरून महिला शेतकरी यांना  हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवाहन केले. याकरिता ज्या महिलांनी आपल्या शेतात भाजीपाला तसेच फुलशेती लागवड केली आहे त्यांनी आणि सोबतच बेरोजगार युवक युवती यांना हा व्यवसाय करणेसाठी ही एक चांगली संधी असून याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले. उपस्थित शेतकऱ्यांपैकी श्री. मनोज पारधी यांनी या  व्यवसायसंबंधित आपले स्वतःचे अनुभव सांगुन मधुमक्षीकापालनासाठी  शेतकऱ्यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले.

          कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. प्रशांत उंबरकर विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र) यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण खिरारी यांनी केले.

          या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कृषि विज्ञान केंद्र, साकोली, आत्मा, कृषी विभाग, भंडारा येथील अधिकारी व  कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *