श्री. बंडूभाऊ बारापात्रे, प्रगतीशील शेतकरी, डोंगरदेव तथा अध्यक्ष, बीटीबी सब्जी मार्केट, भंडारा यांचे शेतावर शेतकरी शास्त्रज्ञ मंच (Farmer Scientist Forum) समितीची सभा सकाळी ११.30 घेण्यात आली.
सभेला मा. ताराचंद नामदेव लंजे, अध्यक्ष, मा. पवन ताराचंद कटनकार, उपाध्यक्ष, मा. डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र , साकोली सचिव, डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, भंडारा, श्री. बंडूभाऊ बारापात्रे, प्रगतीशील शेतकरी, डोंगरदेव तथा अध्यक्ष, बीटीबी सब्जी मार्केट, भंडारा, श्री. मिरासे, तालुका कृषि अधिकारी, मोहाडी, कु. अपेक्षा बोरकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, मोहाडी तसेच जिल्ह्यातील प्रगतीशील/अप्रगशील शेतकरी प्रतिनिधी व महिला शेतकरी प्रतिनिधी तसेच कृषी विज्ञान केंद्र साकोलीचे अधिकारी व जिल्हास्तरीय कृषि तथा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. नितीन तुरस्कर, भंडारा यांनी मधुमक्षिका पालन बाबत स्वताचे अनुभव कथन केले, मधमाशी नष्ट झाली तर मानवी जीवन ५ वर्षामध्ये संपुष्टात येईल, मधमाशीला राष्ट्रीय कीटकांचा दर्जा मिळावा, मधमाशी पालन करिता शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती देऊन, शेतकऱ्यांनी मधमाशी पालन व्यवसाय करावा असे आव्हाहन केले. श्री. तानाजी गायधने, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (सेंद्रिय शेती), चिखली यांनी सेंद्रिय शेती मधील स्वताची वाटचाल व अनुभव कथन केले. यामध्ये त्यांनी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, वापर, प्रमाणिकरन, विक्री व्यवस्था याबाबतीत स्वताचे अनुभव सांगून समितीमधील सर्व सदस्यांनी उपलब्ध जागेमधील थोड्या क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेती करावी असे आवाहन केले.
श्री. अमृत मदनकर, वसंतराव नाईक उद्यान पंडित पुरस्कार, खोलमारा यांनी कारली पिक शेती मधील स्वताची वाटचाल व अनुभव कथन केले. यामध्ये अर्ध्या एकर कारली पिकामधून २.५० ते ३.०० लाख रुपये मिळतात यामध्ये त्यांनी प्लास्टिक मल्चिंग वर कारली लागवड कशी करायची, काय काळजी घ्यावी तसेच बाजाराचा अभ्यास करून भाजीपाला पिकांची लागवड करावी याबाबतीत स्वताचे अनुभव सांगितले. श्री. श्रीकृष्ण वनवे, प्रगतीशील शेतकरी, ठीवरवाडा यांनी कोहळा शेती मधील स्वताची वाटचाल व अनुभव कथन केले. यामध्ये त्यांनी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, वापर, विक्री व्यवस्था याबाबतीत स्वताचे अनुभव सांगून कोहळा हा १२ ते 13 टन उत्पादन तर भाव हा 25 रुपये प्रती किलो याप्रमाणे मिळत आहे असे सांगितले.
श्री. बंडूभाऊ बारापात्रे, प्रगतीशील शेतकरी तथा अध्यक्ष बीटीबी सब्जी मार्केट, भंडारा यांनी भाजीपाला शेती मधील स्वताची वाटचाल व अनुभव कथन केले. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना बाजारपेठेचा अभ्यास करून भाजीपाला पिकाची लागवड करावी तसेच मागणी लक्ष्यात घेऊन त्या त्या महिन्यात पिकांची लागवड करावी, सध्या बीटीबी सब्जी मार्केट, भंडारा मधून ६ ते ७ राज्यात भाजीपाला विक्रीस जात असून शेतकऱ्यांनी भाजीपाला दर्जा व गुणवत्ता योग्य ठेवल्यास जास्त नफा मिळेल असे सांगितले. श्री. राजेश गायधनी, प्रगतीशील शेतकरी, लाखनी यांनी सेंद्रिय शेती मधील स्वताची वाटचाल व अनुभव कथन केले. यामध्ये त्यांनी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, वापर, विक्री व्यवस्था याबाबतीत स्वताचे अनुभव सांगून जमिनिमधला सेंद्रिय कर्ब कमी असून तो वाढविण्याकरिता माती परीक्षण करून, धेंचा व सोनबोरू ची लागवड व सेंद्रिय निविष्ठा बाबत माहिती दिली. श्री. सुधीर धकाते, कृषितज्ञ , भंडारा यांनी भाजीपाला शेती बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी पिकांच्या जाती, गुणधर्म व लागवड, अंतर, कीड व रोग व्यवस्थापन या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मा. डॉ. अर्चना कडू , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, भंडारा यांनी बीटीबी सब्जी मार्केट, भंडारा हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असून यामुळे शेतकऱ्यांचा विक्री व्यवस्था बद्दल अडचण दूर होत आहे, शेतकऱ्यांनी भात पिक वगळून भाजीपाला पिकांची लागवड करावी, या वर्षी आपण तृणधान्य वर्ष साजरा करीत असून शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी व इतर तृणधान्य पिकांची लागवड करावी असे सांगितले.
मा. डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृविके, साकोली तथा सचिव, शेतकरी शास्त्रज्ञ मंच समिती यांनी उपस्थित सर्व सदस्यांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व बाबत माहिती दिली तसेच बीटीबी सब्जी मार्केट, भंडारा च्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस व्यासपीठ मिळाला आहे, सोबतच पंदेकृवी अंतर्गत उत्पादित जैविक खते, बुरसीनासके, किडनासके बाबत सविस्तर माहिती देऊन सदर सर्व उत्पादने कृविके, साकोली इथे विक्रीस उपलब्ध आहेत असे सांगितले.
मा. मिरासे, तालुका कृषि अधिकारी, मोहाडी यांनी उपस्थित सर्वाना कृषि विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच, सदर योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यानंतर श्री. बंडूभाऊ बारापात्रे, प्रगतीशील शेतकरी तथा अध्यक्ष बीटीबी सब्जी मार्केट, भंडारा यांचे शेतावरील विविध भाजीपाला लागवड प्रकल्प यांना भेट देऊन माहिती घेण्यात आली. यानंतर उपस्थित सदस्यांचे आभार मानून मा. अध्यक्ष, यांच्या परवानगीने सभेची समाप्ती करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद पर्वते तर आभार प्रदर्शन श्री. योगेश महल्ले यांनी केले.