कृषि विज्ञान केंद्र, साकोली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारायाच्या संयुक्तविद्यमाने दि.०८/०३/२०२३ ते दि. १०/०३/२०२३ या दरम्यान परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत समूह्स्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाला साकोली तालुक्यातील १५ शेतकरी गटामधील ३८० शेतकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. श्री. पि.पि. गीदमारे, उपविभागीय कृषि अधिकारी, साकोली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन डॉ. उषा रा. डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली उपस्थित होते. यांचेसह श्री. शिवाजी भारती, सदस्य, सर्ग विकास समिती. श्री. स्वप्नील झंझाळ मंडळ कृषि अधिकारी, साकोली, कु. रजनीगंधा टेंभूरकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा,साकोली तसेच कृषी विज्ञान केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन, प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत. कृषी विज्ञान केंद्र साकोली व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा,साकोलीयांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कृषी संवादिनी देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्थावना डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केली या प्रसंगी परंपरागत कृषी विकास योजना संबंधित माहिती दिली तसेच निबोळी अर्क, दशपर्नी अर्क, वनस्पती अर्क यावर सादरीकरण केले.
पहिल्या तांत्रिक सत्रामध्येकु. रजनीगंधा टेंभूरकर यांनी परंपरागत कृषी विकास योजना बाबत मार्गदर्शक सूचना व अंमलबजावणी यावर तर डॉ. . उषा रा. डोंगरवार यांनी सेंद्रिय शेतीची कल्पना फायदे व सेंद्रिय शेती करतांना येणाऱ्या अडचणी यावर सादरीकरण केले. सेंद्रिय शेतीच्या प्रमानीकरानाकरिता काय करावे व काय करू नये या बाबत सविस्तर मार्गदर्शन श्री. योगेश महल्ले यांनी केले.
दुसऱ्या तांत्रिक सत्राकरिता श्री. शिवाजी भारती हे तज्ञ मार्गदर्शक म्हणुन लाभले होते. यावेळी त्यांनी बायोडायनामिक कंपोस्ट यावर सादरीकरण केले. यानंतर डॉ. प्रवीण खिरारी यांनी नाडेप, गांडूळखत निर्मिती यावर तर श्री. लयंत अनित्य यांनी जीवामृत, बिजामृत अमृतपाणी सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतरनाडेप, बायोडायनामिक कंपोस्ट,गांडूळखत निर्मिती,जीवामृत, बिजामृत अमृतपाणी,निबोळी अर्क, दशपर्नी अर्क, वनस्पती अर्क, पंचगव्य इत्यादीचे प्रत्यक्षरित्या प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले. या प्रशिक्षणाच्या शेवटी परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत महिनानिहाय्य करावयाच्या कामाचे नियोजन श्री. प्रमोद पर्वते यांनी घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा,साकोलीयेथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.