डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा मार्फत पिक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन आदर्श गाव अंतर्गत दत्तक घेण्यात आलेल्या परसटोला गावामध्ये करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. हरिश्चंद्र दोनोडे, सरपंच परसटोला, प्रमुख मार्गदर्शक डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, डॉ. आर.एफ. राऊत, प्रमुख, कृषि संशोधन केंद्र, नवेगाव बांध, डॉ. व्ही. एम. बिरादार, प्रमुख, कृषि संशोधन केंद्र, तारसा, श्री. भास्कर ऋषी चीरवतकर, संचालक, ऊस कारखाना, देव्हाडा, श्री. प्रेमलाल डोंगरवार, प्रगतीशील शेतकरी, बोरगाव, श्री. भुरा लंजे, प्रगतीशील शेतकरी, साकोली यांचे सह गावातील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी ऊस पिक व्यवस्थापनामध्ये तन नियंत्रण, महत्व व फायदे विषयावर माहिती देऊन एकात्मिक तन नियंत्रणा विषयी मार्गदर्शन केले. डॉ. आर.एफ. राऊत, प्रमुख, कृषि संशोधन केंद्र, नवेगाव बांध यांनी ऊस पिकाच्या लागवड पद्धती विषयी आणि पाणी व्यवस्थापन विषयी सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. व्ही. एम. बिरादार, प्रमुख, कृषि संशोधन केंद्र, तारसा यांनी ऊस पिकावरील किडींची आणि रोगांची ओळख या विषयी माहिती देऊन एकात्मिक पद्धतीने किड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.
डॉ. पी. एस. उंबरकर, विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र) यांनी जैविक पद्धतीने ऊस पिकावरील किडींचे व्यवस्थापन करण्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री. भास्कर ऋषी चीरवतकर, संचालक, ऊस कारखाना, देव्हाडा, श्री. प्रेमलाल डोंगरवार, प्रगतीशील शेतकरी, बोरगाव, श्री. भुरा लंजे, प्रगतीशील शेतकरी, साकोली यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमामध्ये श्री. कोमल डोये यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेट करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी मोठ्याप्रमाणावर सहभाग दर्शविला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. प्रमोद पर्वते यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. पी. एस. उंबरकर यांनी केले.