कृषी विज्ञान केंद्र साकोली (भंडारा) येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम संपन्न

२०२३ वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून राबवण्यात येणार आहे व  त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्यांची आहारातील व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनेसंयुक्त राष्ट्रसंघाने (UNO) सन २०२३ हे वर्ष तृणधान्ये (Millets) वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे.भारतातील कुपोषण समस्या व पोषणमूल्य सुधारण्यासाठी मिलेटचा आहारात वापर पुन्हा एकदा वाढविणे, त्यांची लागवड वाढविणे, त्यांच्या उपयुक्ततेबाबत समाजात जनजागृती करणे अत्यंत जरुरीचे आहे याच हेतूने कृषी विज्ञान केंद्र साकोली आणि तालुका कृषी अधिकारी साकोली यांच्या संयुक्त विद्यमानेकृषी विज्ञान केंद्र साकोली (भंडारा) येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम संपन्न झाला.

            या कार्यक्रमाला डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा, डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख,कृषी विज्ञान केंद्र साकोली (भंडारा) , श्री. पी पी गीदमारे, उपविभागीय कृषी अधिकारी साकोली, श्री. एस एम ढवळे, तालुका कृषी अधिकारी साकोली, श्री. संजयजी एकापुरे,  अध्यक्ष(FPOगणेशपूर), श्री घनश्यामजी पारधी, कृषिभूषण शेतकरी,  किन्ही मोखे आदी करून ७० शेतकरी उपस्थित होते.

            कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस एम ढवळे, तालुका कृषी अधिकारी साकोली यांनी केली. तर डॉ. उषा डोंगरवार,  वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख,कृषी विज्ञान केंद्र साकोली (भंडारा) यांनी पौष्टिक तृणधान्य ओळख व त्याच्या विविध जाती, गुणधर्म, उपयुक्तता, पौष्टिक तृणधाण्याचे आहारातील महत्व व फायदे यावर सादरीकरण करून उपस्थित शेकऱ्यांच्या शंकेचे निरासरण केले.

            यानंतर कार्यक्रमामध्ये डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी ज्वारी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच उपस्थित शेतकऱ्यांना येत्या रबी हंगामात ज्वारी पिक लागवडीचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री प्रमोद पर्वते तर आभार प्रदर्शन कु. व्ही. जी देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र साकोली आणि तालुका कृषी अधिकारी साकोली येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *