कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा), कृषि विभाग, भंडारा, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा व गणेशपुर शेतकरी उत्पादक कंपनी, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, द्वारा विकसित लसुन पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक व शेतकरी मेळावा दि. 29.11.2022 रोज मंगळवारला, दु. 11.00 वाजता, डॉ. नितीन तुरस्कर यांच्या शेतावर, गाव हत्तीडोई, ता. भंडारा येथे आयोजन करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून करण्यात आली. सर्व उपस्थितांचे स्वागत डॉ.उषा आर. डोंगरवार,वरीष्ठशास्त्रज्ञ तथा प्रमुख,कृ.वि.के.,साकोली यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरूवातिला प्रास्तावीकेमध्ये बोलतांना त्या म्हणाल्या कि धान पिकामध्ये बदल म्हणून लसूनसारख्या पिकाला वाव मिळावा व शेतकÚयांची आर्थिक उन्नती व्हावी तसेच लसुन लागवडीचा खर्च कमी करण्यात यावा या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमालाप्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. एस. एम. घावडे, भाजीपाला पैदासकार तथा उद्यानविद्यावेत्ता, मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र, डॉ. पं.दे.कृ.वि.,अकोला, यांनी लसून लागवड करतांना जमीनिची करावयाची मशागत, लागवडीची वेळ, लागवडीची पद्धत, हेक्टरी बियाणे, सुधारित जाती, खत व पाण्याचे व्यवस्थापन, आंतरमशागत, तन व्यवस्थापन, पिकाचा कालावधी व उत्पादन या बाबत सखोल मार्गदर्शन केले.
मा. श्री. तानाजी गायधने, कृषि भूषण शेतकरी, चिखली,यांनी नैसर्गिक शेतीमध्येएकात्मिक किड व्यवस्थापन करतांना ट्रायकोडर्माचा उपयोग व त्याचे महत्व यावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वापर करावा असे ते याप्रसंगी बोलले.तंत्रज्ञान पोहचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न हे कृषि विज्ञान केंद्र, साकोली सतत करत असतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. नितीन तुरस्कर, सदस्य, गणेशपुर शेतकरी उत्पादक कंपनी, भंडारा तथा हत्तीडोई येथील प्रयोगशील शेतकरी यांनी गेल्या वर्षीच्या हंगामात फेरपालट म्हणून लसून लागवडीवर भर दिला होता. या वेळी बोलतांना त्यांनी लसून लागवड हि मजुरांच्या माध्यमातून केली असता त्यांना एकरी १४ ते १५ हजार रुपयांचा खर्च झाला तसेच एकूण ८० हजार रुपयांचा खर्च त्यांना लागला व यातून साडेचार टन उत्पादकता मिळून व प्रती रुपये १०० किलो प्रमाणे विक्री करण्यात आली हा अनुभव शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा व लसून लागवडीचा उत्पादन खर्च कमी व्हावा याकरिता लसून पेरणी यंत्राद्वारे पेरणी करणे करिता त्यांनी पुढाकार घेतला. ते व्यवसायाने वैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांनी शेतीमध्ये जास्त प्रिसिझन लागते असे अनुभव कथन केले.
यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला विकसित लसून लागवड यंत्र वापरण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले त्यावेळी श्री. ज्ञानेश्वर ताथोड, वि. वि. (कृषी अभियांत्रिकी), कृ. वी. के. गडचिरोली व श्री. वाय. आर. महल्ले, वि. वि. (कृषी अभियांत्रिकी), कृ. वी. के. साकोली यांनी सविस्तर माहिती देऊन उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे समाधान केले. या कार्यक्रमाकरिता हत्तीडोईगावातील व भंडारा जिल्ह्यातील २०० जिज्ञासू शेतकऱ्यांचा सहभाग होता.
याकार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. पी. पी. पर्वते, तर आभार प्रदर्शन डॉ. पी. बी. खिरारी यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेशपुर, शेतकरी उत्पादक कंपनी, शक्ती व अवजारे विभाग डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला व कृषी विज्ञान केंद्र साकोली येथील सर्व कर्मचारी व अधिकारी यांचा सहभाग लाभला.