परसटोला येथे अॅझोला लागवडीचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाचे आयोजन

पशुधन व्यवस्थापन करत असतांना जनावरांना आहारामध्ये वेगवेगळया खाद्यांचा वापर व त्यामधील विविध घटक हे विशेष करून दुध उत्पादनाकरीता आवश्यक असतात.या अनुषंगाने परसटोला या गावी दि. 30.11.2022 रोजी अॅझोला लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षणतसेच प्रात्यक्षिकाचे आयोजन डॉ.उषा आर. डोंगरवार, वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

अॅझोला ही पाण्यावर तरंगणारी हिरवी वनस्पती असून त्यामध्ये 21 ते 22 टक्के प्रथिनांचे प्रमाण आढळते याव्यतिरीक्त त्यामध्ये खनिज पदार्थ, अॅमिनो आम्ल यांचासुद्धा समावेश  असतो. अॅझोला लागवड करतांना जागा खूप कमी लागते तसेच त्यासाठी लागणारे साहित्य कमी खर्चीक असून पशुपालकांकडे सहज उपलब्ध असते व तसेच त्याची वाढ होण्याकरीता 15 ते 20 दिवस इतका कमी कालावधी लागतो. पशुखाद्यामध्ये अॅझोलाचा वापर केल्यामूळे पशुपालकांना इतर पशुखाद्यावरील होणारा नाहक खर्च टाळता येवू शकतो. जनावरांच्या आहारामध्ये अॅझोलाचा वापर पशुखाद्य म्हणून केल्यास जनावरांचे दुध उत्पादनात वाढ दिसून येते याचबरोबर दुधामधील स्निग्धंाशामध्ये वाढ झाल्याचे दिसुन येते. याकरीता शेतकऱ्यांनी पशुधन व्यवस्थापनेमध्ये जनावरांच्या आहारात अॅझोलाचा वापर करावा असे आवाहन डॉ. पि. बि. खिरारी, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धषास्त्र), कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले आहे.

            परसटोला या गावी अॅझोला लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण उपस्थित शेतकऱ्यांना  दिले व त्यानंतर अॅझोला लागवड करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य यामध्ये प्लास्टिकच्या ताडपत्री, अॅझोला कल्चर यांचा समावेश होत असून निविष्ठा म्हणुन त्यांचा वापर करावा असे प्रात्यक्षिक करत असतांना सांगितले.

            अॅझोला लागवड तंत्रज्ञान याविषयी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केल्यानंतर यासाठी लागणारी ताडपत्री, अॅझोला कल्चर, सिंगल सुपर फॉस्फेट निविष्ठा म्हणून उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली व तसेच त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर घेवून माहिती सांगण्यात आली. या कार्यक्रमामध्ये परसटोला गावामधील शेतकरी, महिला शेतकरी उपस्थित होते

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *