माती परीक्षण करणे काळाची गरज : मा. श्री. हरिश्चंद्र दोनोडे

जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न

जागतिक पातळीवर ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाचे आयोजन करण्यात येते. ज्या प्रकारे मानवालारक्ताची तपासणी केल्यानंतर कोणकोणत्या बाबींची कमतरता आहे हे कळते त्यानुसार शरीरातील कमतरता भरून काढण्यासाठीमनुष्याला औषध देण्यात येते. त्याप्रमाणे जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्य माती परीक्षण केल्यानंतर उपलब्ध विविध घटकांची माहिती मिळते. माती परीक्षण केल्यानंतर मिळालेल्या मृदा आरोग्यपत्रिकेनुसार खत व्यवस्थापन केल्यास पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. याशिवाय जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञानकेंद्र, साकोली, भंडारा मार्फत जागतिक मृदा दिनाचे आयोजन डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत, परसटोला येथे करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात माती परीक्षणविषयी जनजागृती करण्याकरिता गावातून प्रभात फेरी काढून करण्यात आली. यामध्ये सर्व शेतकरी, महिला शेतकरी, शिक्षक यांनी उस्फुर्तपणे सहभाग दर्शविला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. हरिश्चंद्र दोनोडे, सरपंच, परसटोला, प्रमुख उपस्थिती मध्ये मा. सौ. केशर कांबळे, उपसरपंच, परसटोला, मा. सौ. प्रतीक्षा खोब्रागडे, प्रभाग समन्वयक, उमेद, एकोडी, मा. श्री. वाय.एस. धुर्वे, ग्राम विकास अधिकारी, परसटोला, मा.सौ. उषा टेकाम, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, परसटोला, मा.सौ. मंदाताई कांबळे, अध्यक्ष, शालेय शिक्षण समिती, परसटोला, मा.सौ. माधवी कांबळे, अध्यक्ष, यशस्वी महिला ग्रामसंघ, उमेद, परसटोला, मा.सौ. डूलेश्वरी डोये, सदस्य, ग्रा. पं., परसटोला, मा.सौ. भारती कठाने, सदस्य, ग्रा. पं., परसटोला, मा.श्री. निताराम कठाने, सदस्य, ग्रा. पं., परसटोला, मा.श्री.  पुरुषोत्तम रामटेके, सदस्य, ग्रा. पं., परसटोला, मा.सौ. ओमिंद्रा सेलोकर, सदस्य, ग्रा. पं., परसटोला, मा. श्री. पी. बी. चौधरी, सहाय्यक शिक्षक, जि.प.  परसटोला, श्री. कोमल डोये, कृषि मित्र, परासटोला हे उपस्थित होते.

डॉ. प्रवीण खिरारी, विषय तज्ञ (पशूसंवर्धन व दुग्धशास्त्र) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना माती परीक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच गांडुळ खत तयार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत याविषयी मार्गदर्शन केले.

श्री. लयंत अनित्य विषय तज्ञ (हवामान शास्त्र) यांनी जमिनीचे आरोग्य तसेच सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयी तर श्री. योगेश महल्ले विषय तज्ञ (कृषि अभियांत्रिकी) यांनी मातीचा नमूना घेण्याची शास्त्रीय पद्धत व माती परीक्षणाकरीता लागणाऱ्या आवश्यक बाबी आणि मृदा आरोग्यपत्रिकेनुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. प्रशांत उंबरकर विषय तज्ञ (किटकशास्त्र) यांनी रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांवरील किड व रोग व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेती याविषयी मार्गदर्शन केले. श्री. कपिल गायकवाड कार्यक्रम सहाय्यक (संगणक) यांनी माहिती तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर तसेच शेतीविषयक विविध अॅप्स विषयी माहिती दिली.

मान्यवरांच्या मार्गदर्शनात श्री. एस. डी. चव्हाण (कृषि सहाय्यक) यांनी शासनाच्या विविध योजना योजनांविषयी,  सौ. प्रतीक्षा खोब्रागडे, प्रभाग समन्वयक, (उमेद) यांनी परसबाग भाजीपाला लागवड करतांना सेंद्रिय खतांचा वापर याबाबत, श्री. वाय.एस. धुर्वे, ग्राम विकास अधिकारी, परसटोला यांनी उत्पादन वाढीसाठी सुपीक जमिनीचे महत्व, श्री. पी. बी. चौधरी, सहाय्यक शिक्षक, जि.प.  परसटोला यांनी शालेय शिक्षण घेत असतांना शेती विषय निवडून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. योगेश महल्ले तर आभार प्रदर्शन श्री. पी. पी. पर्वतेयांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथील सर्व कर्मचारी व अधिकारी , ग्रामपंचायत कार्यालय येथील सर्व पदाधिकारी, परसटोला व जि. प. प्राथमिक शाळा, परसटोला  येथील शिक्षकवृंद यांचा सहभाग लाभला. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *