मानवी जिवनात योग व प्राणायामाचे अनन्य साधारण मलत्व असून, नियमीन प्राणायाम केल्यास शरीरातील विकार व्याधींवर मात करता येते, यामध्ये शारीरीक व मानसीक स्वास्थ्याला लाभ होतो, दैनंदीन बदलती जीवनशैली मध्ये निरोगी राहण्याकरीता योग व प्राणायाम नियमीत करने गरजेचे आहे असे पतीपादन डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले. कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत जागतिक योग व प्राणायाम प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होत्या.
मौजा परसटोला इथे, आज दि. २१ जून, २०२२ रोजी जागतीक योग दिन निमित्त, कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) यांच्या वतीने योग व प्राणायाम प्रशिक्षन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला गावाचे सरपंच श्री. हरीशचंद्र दोनोडे, योग प्रशिक्षक व प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉ. उषा आर. डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, श्री. प्रमोद पर्वते, वि.वि., कृ.वि., श्री. योगेश महल्ले वि.वि., कृ.अ., डॉ, प्रवीण खिरारी, वि.वि., पशु संवर्धन, डॉ. प्रशांत उंबरकर, वि.वि., कीटक शास्त्र, श्री. लयंत अनित्य, वि.वि., कृषि हवामान शास्त्र, यांचेसह गावातील शेतकरी, उमेद अंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्या तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभव विद्यार्थी कृषि महाविद्यालय नागपूरचे विद्यार्थी उपस्थीत होते.
कार्यक्रमामध्ये योग प्रशिक्षक डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, यांनी उपस्थितांना योग व प्राणायामवबद्दल माहीती देऊन, विवीध आसने करून दाखविली, तसेच उपस्थीत सर्वांनी योग व प्रनामायाम करून जागतिक योग दिवस साजरा केला. यामध्ये विवीध आसने करण्यात आली व त्याचे महत्व सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी गावामध्ये योग व प्राणायाम जनजागृती रली काढण्यात आली व संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव विद्यार्थी ग्रुप, परसटोला, पिंडकेपार, बोदरा, सोनपूरी, एकोडी, बोरगाव यांनी प्रयत्न केले तसेच श्री. गणेश गुसिंगे, श्री. सुखदेवे, श्री. जागेश्वर संग्रामे यांनी प्रयत्न केले.