विविध उपक्रमाद्वारे स्वच्छतेची जनजागृती

कृषी विज्ञान केंद्र,साकोली अंतर्गत दरवर्षी प्रमाणे स्वच्छता पंधरवडा ,स्वच्छता हि सेवा या कार्यक्रमांद्वारे स्वच्छतेविषयी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. दिनांक १६.१२.२०२० ते ३१.१२.२०२० या कालावधीत विविध ठिकाणी जाऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

.सर्वप्रथम गिरोला या गावी  स्वच्छता पंधरवडा या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. व त्यानंतर ज्या उपक्रमांद्वारे स्वच्छतेची जागृती करण्यात येणार आहे. त्याबाबतीत माहिती दिली. सुरवातीला कार्यालयामधील स्वच्छता करताना आवश्यक आणि अनावश्यक फाईल, नोंदवही वेगळ्या करून स्वच्छता केली. स्वच्छता उपक्रमांतर्गत बाजारपेठेतील, वसाहतीमधील स्वच्छता, विघटनशील व अविघटनशील पदार्थ जमा करून त्याची विल्हेवाट करून स्वच्छतेची उपास्थितांना माहिती देण्यात आली. घरातील टाकाऊ पदार्थांचा वापर करून सेंद्रिय, कम्पोस्ट खत तयार करता येते तसेच गोठ्यातील शेणाचा वापर करून बायोगॅस तयार करणे, प्लॅस्टिक मुक्त गाव करून प्लॅस्टीकचा पुनर्वापर करता येते त्यासाठी गावामधील प्लॅस्टीकचे वेगवेगळे प्रकार एकत्रित करणे आवश्यक असून त्यावर प्रोसेसिंग करून त्याचा पुनर्वापर करा,काही ठीकाणी खराब पाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करता येने शक्य आहे असे पटवून दिले.

कृषी विज्ञान केंद्र,साकोली येथे दिनांक २३.१२.२०२० रोजी किसान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये  तज्ञ व्यक्तीने स्वच्छतेचे मानवी जीवनात महत्व या विषयावर उपस्थितांना माहिती दिली. तसेच कृषी विज्ञान केंद्र,साकोली अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये जाऊन तेथील शेतकरी, ग्रामीण महिला, युवक-युवती यांना स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.परेश हायस्कूल, किन्ही मोखे या ठिकाणी जाऊन तेथील विद्यार्थ्यासाठी स्वच्छतेचे  महत्व या विषयावर निबंध स्पर्धा, चर्चा, व्रक्तुत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थी–विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.या उपक्रमामध्ये कोविड-१९ पासून सावधानी बाळगताना तोंडावर मास्कचा, वापर, दैनंदिन व्यवहार करताना सामाजिक अंतरचे पालन,हात निर्जंतुकीकरनासाठी  सानिटायझरचा वापर करावा याबाबतीत जनजागृती केली.

स्वच्छतेची सुरवात  कृषी विज्ञान केंद्र,साकोली कार्यालयापासून करण्यात आली. याकरिता येथील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले. एकूण विविध गावामधील १२० लोकांनी सहभाग घेतला.यामध्ये गिरोला, निलागोंदी, धर्मापुरी, उमरी, किन्ही मोखे,साकोली राजेगाव, सालेभाटा या गावांचा समावेश असून या ठिकाणी स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करण्यात आला.

विविध उपक्रमांद्वारे मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आवश्यक आहे असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र,साकोली येथील कार्यक्रम समन्वयक,डॉ एन. एस. वझिरे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *