कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत कृषी विकास योजना मार्फत वैरण पीक लागवड तंत्रज्ञाना मध्ये रब्बी हंगामाकरीता बहुवार्षिक चारा पिक (हायब्रीड नेपिअर) चे पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात उमरी या गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांना हायब्रीड नेपियर चे प्रत्येकी २०० थोम्ब देण्यात आली होती. तसेच यावेळी त्यांना हायब्रीड नेपियरची लागवड कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यात आली होती.
उमरी येथील श्री. भोजराजी कापगते यांच्या प्रक्षेत्रावर कृषी विज्ञान केंद्राचे श्री प्रवीण खिरारी विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) व योगेश महल्ले विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) यांनी प्रत्यक्ष भेट दिली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान चारा पिकाची लागवड पद्धत, पिकांना देण्यात आलेली खते,पाण्याच्या पाळ्या तसेच उत्पादन वाढीबाबत सविस्तर चर्चा झाली. हायब्रीड नेपिअर बहुवार्षिक चारा पिक असल्यामुळे याचा वापर वर्षांनुवर्ष सहज करता येईल तसेच उपलब्ध चाऱ्याचा पुढील क्षेत्र वाढीसाठी सुद्धा वापर करू असे उपस्थित शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.