कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे सरपंच मेळावा संपन्न

विकसित भारत जी राम जी अंतर्गत सरपंच संमेलन कार्यक्रमाचे आयोजन

कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे विकसित भारत जी रामजी अंतर्गत सरपंच संमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री, शरद इटवले, अध्यक्ष जिल्हा सरपंच संघटना व प्रमुख पाहुणे म्हणून  श्री. लीलाधर सोनवणे अध्यक्ष, साकोली तालुका सरपंच हे  उपस्थित होते. श्री.जी ए लांबकाने उपकृषी अधिकारी, साकोली यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.उषा डोंगरवार ,वरिष्ठ  शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र साकोली यांनी केले.

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आंब्याचे रोप  देऊन करण्यात आले.यानंतर या कार्यक्रमांमध्ये तांत्रिक सत्रामध्ये                           डॉ. प्रशांत उंबरकर ,विषय विशेषज्ञ, कीटकशास्त्र यांनी जैविक पद्धतीने  किड व रोगाचे व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले तर डॉ. प्रवीण भाऊ खिरारी, विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र यांनी अझोला लागवड व चारा पिके यावर मार्गदर्शन केले. श्री. कपिल गायकवाड ,कार्यक्रम सहाय्यक संगणक, यांनी किसान सारथी उपक्रमाबाबत  माहिती व मार्गदर्शन उपस्थिती केले.

या कार्यक्रमात श्री. घनश्यामजी पारधी सरपंच, किन्ही मोखे  व श्री ताराचंद यांनी सरपंच पिंडकेपार यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या पूर्णतेसाठी कृषी विज्ञान केंद्रातील साकोली येथील अधिकारी व कर्मचारी यांनी आता प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद पर्वते व आभार श्री. योगेश महल्ले यांनी केले.

 डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ  शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र,साकोली(भंडारा) यांच्या मार्गदर्शनाखाली,श्री. प्रमोद पर्वते, श्री. योगेश महल्ले, डॉ. प्रवीण खिरारी,डॉ. प्रशांत उंबरकर, कु, कांचन तायडे, श्री.लयंत अनित्य, श्री. कपिल गायकवाड,श्री.सोमनाथ गवते, यांनी या कार्यक्रमाच्या पूर्णतेसाठी परिश्रम घेतले.

Share:

Author: kvk-sakoli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *