पावसाळा सुरु होण्यापूर्वी निंबोळ्या जमा करून साठवून ठेवा -कृषि विज्ञान केंद्र, साकोली

खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या धान, तूर, सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके तसेच ईतर पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर अतिशय फायदेशीर आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कडूनिंबाच्या झाडाला निंबोळ्या लागलेल्या असून त्या पावसाळा सुरु होण्यापूर्वी जमाकरून व्यवस्थितपणे साठवणूक करावी. जेणेकरून पिकांवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काचा वापर करता येईल. यामुळे खर्चात बचत होऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी निंबोळ्या गोळाकरून व्यवस्थितपणे साठवून ठेवा आणि येणाऱ्या खरीप हंगामात किड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क तयार करून वापर करावा असे आवाहन डॉ. प्रशांत एस. उंबरकर, शास्त्रज्ञ (किटकशास्र) आणि डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा यांनी केले आहे. 

कडूनिंबाच्या झाडाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या वृक्षाला कल्पवृक्ष म्हणूनसुद्धा ओळखले जाते. झपाट्याने वाढणारे कडूनिंबाचे झाड मुळचे भारतीय भूखंडातील आहे. महाराष्ट्रात कडूनिंब सर्वत्र आढळतात. या वृक्षाचा प्रत्येक भाग अतिशय उपयोगी आहे. अशा प्रकारचे बहु उपयोगी वृक्ष असल्यामुळे कृषि क्षेत्रात या झाडाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. महागड्या रासायनिक कीटकनाशकांचे अनेक दुष्परिणाम जगासमोर येत आहेत. अश्या रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा उदा. निंबोळी अर्काचा उपयोग करणे गरजेचे आहे. मानवी जीवास हानिकारक ठरणाऱ्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हुणुन निंबोळी अर्काचा वापर करणे काळाची गरज आहे.

कडूनिंब या वृक्षाचे शास्त्रीय नाव अझाडीराकटा इंडीका असे आहे.

निंबोळ्या गोळा करण्याची पद्धत:

कडूनिंबाच्या झाडाला सामान्यतः वर्षातून एकदाच फळधारणा होते. झाडाच्या फांद्या हलविल्या की निंबोळ्या जमिनीवर गळून पडतात आणि गोळा करता येतात किंवा झाडाखाली पिकलेल्या पिवळ्या निंबोळ्याचा सडा पडलेला असतो. त्या गोळा करता येतात. काडी कचरा काढून टाका. गोळा केलेल्या निंबोळ्या व्यवस्थित जमा कराव्यात.

निंबोळ्या वळविण्याची पद्धत:

निंबोळ्या उन्हात कोरड्या जागेवर चांगल्या वाळेपर्यंत पसरून ठेवाव्यात.  निंबोळ्याचा थर शक्य तेवढा पातळ ठेवावा. वाळविण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी. कारण व्यवस्थितपणे न वाळलेल्या निंबोळ्याना बुरशी लागू शकते. पावसाळ्यामध्ये निंबोळ्या बाहेर वळविल्या जात असल्यास पाऊस पडण्यापूर्वी त्या गोळा करून घरात आणून ठेवाव्यात.

निंबोळ्या साठवून ठेवण्याची पद्धत:

अयोग्य प्रकारे साठवून ठेवलेल्या निंबोळ्याला बुरशी लागु शकते. निंबोळ्या पोत्यात किंवा टोपल्यामध्ये भरून हवेशीर जागेवर साठवून ठेवाव्या. हवाबंद प्लास्टिक  पिशव्या किंवा डब्या मध्ये निंबोळ्या साठविणे अयोग्य आहे.

निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत:

१. उन्हाळ्यात (पावसाळ्याच्या सुरवातीस) निंबोळ्या उपलब्ध असताना जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ कराव्या आणि साठून ठेवाव्यात.

२. फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तितक्या निंबोळ्या कुटून बारीक कराव्या.

३. पाच किलो निंबोळी चुरा ९ लिटर पाण्यात (फवारणीचा आदल्या दिवशी सायंकाळी) भिजत टाकावा तसेच १ लिटर पाण्यात २०० ग्राम साबणाचा चुरा वेगळा टाकावा. 

४. दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळ्याचा अर्क चाळणी/फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. या अर्कात १ लिटर  पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा सर्व अर्क ऐकून १० लिटर होईल एवढे पाणी टाकावे.

५. वर नुमूद केल्या प्रमाणे तयार केलेला १ लिटर अर्क ९ लिटर पाण्यामध्ये मिसळून ढवळावा व फवारणी साठी वापरावा. अशा प्रकारे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशी तयार करून वापरावा. 

निंबोळी अर्क कसा वापरावा?

फवारणी यंत्र वापरण्या अगोदर निंबोळी अर्काचे मिश्रण चाळणी/कापडाच्या सहाय्याने व्यवस्थित गाळून घ्यावे. नाहीतर मिश्रानमधील घन पदार्थ अडकून नोझल बंद होईल. एका प्लास्टिक बादलीच्या तोंडावर कापड बांधावे आणि त्यात हे मिश्रण ओतावे. त्यानंतर निंबोळी अर्काचा वापर करावा.

फवारणीचे वेळ

निंबोळी अर्काची फवारणी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सायंकाळी चार वाजेनंतर करणे योग्य असते.

Share:

Author: kvk-sakoli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *