एल निनोच्या उपाययोजनेसाठी पेरीव धान पद्धत उपयुक्त -डॉ. उषा रा. डोंगरवार

येते वर्ष हे एल निनोच्या प्रभावाचे वर्ष असल्यामुळे कमी पर्जन्यमानाची दाट शक्यता आहे. यावर उपाययोजना म्हणून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी बंधूनी धान लागवडीसाठी पेरीव धान पद्धतिचा वापर करावा असे आवहन वरिष्ठ शाश्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र साकोली यांनी केले आहे. 

पारंपरिक धान शेती व वातावरण बदल याचा संबंध – भातशेतीमध्ये पारंपरिक पद्धतीने शेत नेहमी पाण्याखाली ठेवले जाते. पाणी साचल्यामुळे मातीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो. यामुळे जमिनीत असणारे सेंद्रिय पदार्थ आणि पिकांचे अवशेष ऑक्सिजनशिवाय कुजतात. या प्रक्रियेमुळे जमिनीत ‘मिथेनोजेन्स’ नावाचे जिवाणू तयार होतात, जे मिथेन वायूचे उत्सर्जन करतात. हा वायू भाताच्या रोगांच्या माध्यमातून वातावरणात मिसळतो. जागतिक स्तरावर, मानवामुळे होणाऱ्या मिथेन उत्सर्जनामध्ये भातशेतीचा वाटा सुमारे १० ते १२% आहे. मिथेन हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा सुमारे २८ पटीने अधिक शक्तिशाली हरितगृह वायू आहे, ज्यामुळे जागतिक तापमानवाढ (Global Warming) वाढते.

  पेरीव धान पद्धत व त्याचे महत्व काय

यंत्राने धानाची लागवड करणे पुर्व विदर्भात आवत्या पद्धत ही दोन प्रकारची असून यामध्ये पारंपारिक आवत्या (धान बियाणे फेकुन) व पेरिव आवत्या (पेरणी पद्धत) यांचा समावेश होतो.

  • बदलत्या हवामानानुसार पाण्याचे संवर्धन– रोवणी पद्धतीत धानाची रोपवाटिका तयार करणे, जगवणे, रोपांची वाहतूक करणे, चिखलणी, व पुर्नलागवड (रोवणी) करणे या कामाकरिता २० ते २५ टक्के  पाणी लागते म्हणजेच भातशेतीच्या एकूण सिंचनाच्या आवश्यकतेपैकी सुमारे २० टक्के पाणी हे रोपणासाठी शेत समतल  (चिखलणी) करण्यासाठी वापरले जाते. पेरीव पद्धत  पेरणी तंत्राचा अवलंब केल्यास २० ते २५ टक्के पाण्याची बचत होते कारण या पद्धतीने भात पेरणी केल्यास शेतात सतत पाणी साचवून ठेवण्याची गरज नाही. यामुळे एल निनोच्या प्रभावामुळे कमी होणाऱ्या कमी पर्जन्यमानावार आपल्याला मत करता येईल.या तंत्रज्ञाणामुळे निविष्ठांचा कार्यक्षम वापर होतो, वेळेवर शेती कामाची पूर्तता होते ,उत्पादन खर्चात घट होते ,शेतीतील कष्ट कमी होते

पेरीव पद्धतीने पेरणीकरिता  वापरली जाणारी सुधारित यंत्रे

  • तिफण किंवा पेरणी यंत्र:- पेरणी शक्यतो तिफनीने किंवा ट्रॅक्टर  चलित पेरणी यंत्राद्वारे करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर २० से.मी. व दोन रोपातील अंतर हे १० ते १५ से. मी. ठेवावे. बियाणे २ ते ४ से.मी. खोल पडेल या बेताने तिफन किंवा पेरणी यंत्र चालवावे.
  • धाची थेट पेरणी पद्धत (डीएसआर) :- धान पेरणीकरीता लुधियाणा येथील पंजाब कृषी विद्यापीठामध्ये हे यंत्र विकसित करण्यात आले आहे. या यंत्राला ११ दाते असून दोन ओळीतील अंतर २५ ते ३० से.मी.तर दोन रोपातील अंतर ५ ते ७ से.मी. पर्यंत ठेवता येते. एका तासात एक ते दीड याप्रमाणे दिवसभरात ८ ते १० एकर पेरणी करणे सहज शक्य होते. बियाण्यांची जवळपास २० ते२५ किलो प्रती हेक्टरी बचत होते. दोन ओळीतील अंतर २५ ते ३० से.मी पर्यंत असल्याने यामध्ये हवा खेळती राहून पिकाची वाढ चांगली होते तसेच आंतरमशागत  व कापणी करीता अवजारांचा सहज वापर करता येतो.
  • हॅपी सीडर -हॅपी सीडर यंत्राने शेतातील मागील पिकांचे राहिलेले अवशेष न काढता थेट पिकांची पेरणी करता येते.
Share:

Author: kvk-sakoli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *