राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनीमध्ये, कृषि विज्ञान केंद्र, भंडारा (साकोली) ला प्रथम क्रमांक*

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे आयोजित राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनी ॲग्रोटेक २०२५ चा समारोप

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात राज्यस्तरीय भव्य कृषि प्रदर्शनीचे आयोजन डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७  व्या जयंती निमित्य राज्यस्तरीय भव्य कृषि प्रदर्शनीचे आयोजन, विद्यापीठ क्रीडांगण, डॉ. पं.दे.कृ.वि, अकोला येथे करण्यात आले होते.

या राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव, कृषि श्री. विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी, अकोला श्रीमती. वर्षा मीना, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य श्री. शिवराम घोडके,  संचालक, विस्तार शिक्षण,डॉ. धनराज उंदिरवाडे,संचालक, संशोधन,डॉ. श्यामसुंदर माने, संचालक शिक्षण डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे, कुलसचिव डॉ. सतिष ठाकरे, नियंत्रक श्री. राजिव कटारे, विद्यापीठ अभियंता श्री. सुनील थोटांगे, कृषि विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. गणेश घोरपडे, प्रकल्प संचालक, आत्मा, डॉ. मुरली इंगळे, अटारी पुणेचे प्रधान  वैद्यानिक डॉ. शाकीर अली  व इतर मान्यवरांच्या हस्ते कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांना प्रथम क्रमांक देऊन स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. 

कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी *शाश्वत शेती समृद्ध शेतकरी* संकल्पनेवर आधारित “एकात्मिक शेती पद्धती ” वर कृषि प्रदर्शनीमध्ये स्टाल ची मांडणी केली होती, यामध्ये एकात्मिक शेती पद्धती मॉडेल मध्ये, नैसर्गिक शेती, टसर रेशीम शेती, मधुमक्षिकापालन, अळंबी लागवड, लाखशेती, फळबाग शेती, पशु संवर्धन, एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धती दाखविण्यात आली होती. यासोबतच शेतकरी चे उत्पन्न वाढविण्याकरिता पिक उत्पादकता वाढविणे, पिक लागवडीचा खर्च कमी करणे व प्रक्रिया व मूल्यवर्धन या वर आधारित विविध वाण, पिक पद्धती, पद्धती, सुधारित कृषि औजारे, कुकुटपालन, शेळीपालन, कृषि हवामान केंद्र यासोबतच विविध कृषि तंत्रज्ञान बाबत मॉडेल मांडणी केली होती. यामध्ये  “धानाचे विविध वाण व मूल्यवर्धन मॉडेल, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन मॉडेल व शिंगाडा पिक” हा सर्वांचा आकर्षणाचा ठरला, यामध्ये फिरते चक्र तयार करून त्यावर विविध शिंगाडा वाण व मूल्यवर्धन मॉडेल, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनमॉडेल व भरडधान्य व त्यांची माहिती दाखविण्यात आली होती.

Share:

Author: kvk-sakoli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *