डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा व कृषि संशोधन केंद्र, साकोली मार्फत दि. ०८/०६/२०२३ रोजी मान्सून पूर्व शेतकरी मेळावा व चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथे करण्यात आले आहे. या मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. सुनील मेंढे, खासदार, भंडारा-गोंदिया, लोकसभा क्षेत्र, मा. श्री. नानाभाऊ पटोले, आमदार, साकोली विधानसभा क्षेत्र, मा. श्री. नरेंद्र भोंडेकर, आमदार, भंडारा विधानसभा क्षेत्र, मा. श्री.राजूभाऊ कारेमोरे, आमदार, तुमसर विधानसभा क्षेत्र, विशेष अतिथी म्हणून मा. डॉ. विजय माहोरकर व मा. श्री. प्रशांत कुकडे, सदस्य, कार्यकारी परिषद, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, प्रमुख उपस्थिती मध्ये मा. डॉ. विलास खर्चे, संचालक संशोधन, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला व मा. डॉ.धनराज उंदिरवाडे, संचालक विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, विशेष उपस्थिती मध्ये कृषिभूषण शेतकरी मा. श्री. तानाजी गायधने, शेतीनिष्ठ शेतकरी मा. श्री. घनश्याम पारधी तसेच मा. डॉ. अनिल कोल्हे सहयोगी संशोधन संचालक, वि.कृ.सं.कें, सिंदेवाही, मा. श्रीमती. संगीता माने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, भंडारा, मा. श्रीमती. उर्मिला चिखले, प्रकल्प संचालक, आत्मा, भंडारा व मा. श्री. विवेक बोंद्रे, प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं., भंडारा हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्रामध्ये डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला द्वारे विकसित सुधारित वाण या विषयावर डॉ. मिलिंद मेश्राम, वरिष्ठ भात पैदासकार, कृ.सं.कें, साकोली, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृ.वि.के. साकोली, एकात्मिक पिक संरक्षण या विषयावर डॉ. प्रशांत उंबरकर, विषय तज्ञ (किटकशास्त्र), कृ.वि.के. साकोली, शेतीमध्ये विविध औजारांचा वापर यावर श्री. योगेश महल्ले, विषय तज्ञ (कृषि अभियांत्रिकी), कृ.वि.के. साकोली हे मार्गदर्शन करणार आहे. कृषि प्रदर्शनीचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे.यावेळी डॉ. पं. दे. कृ. वि. अंतर्गत विकसित विविध धान वाणांचे बियाणे, बिजप्रक्रीये करिता जैविक खते, ट्रायकोडर्मा, कचरा व तनस कुजविणारे जीवाणू, कृषि संवादिनी व पुस्तके विक्रीस उपलब्ध राहणार आहेत.
तरी सर्व शेतकरी बंधू-भागीनींसह कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृ.वि.के. साकोली यांनी केले आहे.