उत्पन्न वाढीसाठी त्रिसूत्रीचा अवलंब करावा – डॉ. शरद गडाख, कुलगुरू, पं.दे.कृ.वि. अकोला

पापडा खुर्द येथे आदर्श गाव विशेष आढावा सभा संपन्न

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा कडून  साकोली तालुक्यातील पापडा खुर्द या गावाची निवड आदर्श ग्राम म्हणून करण्यात आली आहे.या विशेष आढावा सभेकरिता अध्यक्षस्थानी डॉ. शरद गडाख, कुलगुरू,पं.दे.कृ.वि. अकोला, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. धनराज ऊंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण, पं.दे.कृ.वि. अकोला, श्री. भाष्कर खंडाईत, सरपंच, ग्रामपंचायत झाडगाव-पापडा खुर्द, श्री. किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषि अधिकारी, साकोली, डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा उपस्थित होते. सभेदरम्यान पापडा खुर्द येथील गठीत ग्राम विकास समिती कार्यालयाचे उद्गाटन मा. डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. 

          कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत पापडा खुर्द गावातील महिलांनी स्वागतगीत सादर करून करण्यात आले. ग्राम विकास समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. हलीम शेख, उपाध्यक्ष सौ. कोकिळा झोडे आणि सचिव श्री. हरी लांजेवार यांचे मान्यवरांच्या हस्ते आभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. काही निवडक शेतकऱ्यांना परसबाग प्रात्यक्षिक युनिटकरिता केळी व शेवगा रोपांचे वितरण करण्यात आले.

          डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आदर्श गाव तयार करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र अंतर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

           श्री. भाष्कर खंडाईत, सरपंच, ग्राम पंचायत, झाडगाव-पापडा खुर्द यांनी आदर्श ग्राम तयार करण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर सर्व प्रकारचे सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले.

          श्री. किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषि अधिकारी, साकोली यांनी कृषि विभागाच्या विविध योजना त्यामध्ये फळ पिक लागवड,यांत्रिकीकरण, कंपोस्ट खत निर्मिती, सिंचन योजना या विषयी सविस्तर माहिती दिली.

          डॉ. धनराज ऊंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण, पं.दे.कृ.वि. अकोला यांनी आदर्श गाव तयार करणेकरिता शेतीसोबत विविध पूरक व्यवसाय आणि कृषिमध्ये यांत्रिकीकरणाची गरज तसेच  शेतकऱ्यांना शेती विषयक समस्या सोडविण्याकरिता शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्यात आली आहे, याविषयी माहिती दिली.

          विद्यापीठ आणि विविध संलग्नित विभाग यांच्या समन्वयाने आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.शहरातील पैसागावात कसा आणता येईल या करिता विशेष प्रयत्न आवश्यक आहे,उत्पन्न वाढीसाठी त्रिसूत्रीचा अवलंब करावा. असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्येडॉ. शरद गडाख, कुलगुरू यांनी पापडा खुर्द या गावी आयोजित केलेल्या विशेष आढावा सभेत केले.

          चि. तन्मय लंजे या बालकाने आपल्या घराजवळील जागेमध्ये अझोला युनिट तयार केले. बालवयात केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे  त्याचे कौतुक करून इतरांना प्रेरणा मिळावी याकरिता चि. तन्मय लंजे या बालकाचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

          मान्यवरांनी पापडा खुर्द गावातील विविध प्रात्यक्षिक जसे चिकट सापळे, फळ माशी सापळे, गांडूळ खत निर्मिती, अझोला ई. युनिटलाभेट देऊन मार्गदर्शन केले. 

          कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रशांत उंबरकर, विषय तज्ञ (किटक शास्त्र) तसेच आभार प्रदर्शन श्री. प्रमोद पर्वते, विषय तज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पापडा खुर्द या गावातील सर्व शेतकरी बांधव, महिला, ग्रामीण युवकांचा तसेच कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील अधिकारी कर्मचारी वृंद यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *