गरीब कल्यान सम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन 

कृषी विज्ञान केंद्र, साकोली व उमेद साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने ” गरीब कल्यान सम्मेलन ”  थेट प्रसार कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 31.05.2022 रोजी सकाळी 9.00 वाजता लहरीबाबा मठ सभागृह, साकोली इथे करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाध्ये  मा. प्रधानमंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली हे  शेतक-याशी थेट संवाद साधणार असून केंद्र सरकार संचालीत विवीध योजनांमधील विविध लाभार्थी सोबत संवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रमाचे थेट प्रसारण कार्यक्रम दि. 31. 05. 2022 रोजी होणार असून, जिल्हातील शेतकरी सदर कार्यक्रमात  सहभागी होणार आहेत.

सदर, कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, विवीध विभागांचे अधिकारी / कर्मचारी यांचे सह शेतकरी उपस्थीत राहणार आहेत. कार्यक्रम स्थळी  खरीप  हंगाम नियोजनाच्या दृष्टीकोनातून “कृषी प्रदर्शनी” चे  आयोजन करण्यात आले आहे.  कृषी प्रदर्शनी मध्ये विवीध विभाग सहभागी होणार असुन विविध  विभागाचे तंत्रज्ञान  प्रदर्शित करणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत प्रसारीत धान पिकाचे विवीध वाण कृषी प्रदर्शनीमध्ये  शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत.

तरी जास्तीत जास्त शेतकरी बंधुनी कार्यक्रमाला उपस्थीत रहावे, असे आवाहन कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले आहे. 

 

Share:

Author: kvk-sakoli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *