कुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक नफा मिळवावा : डॉ. नरेश कापगते –ग्रामीण युवकांना कौशल्य विकास करिता कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

ग्रामीण युवकांनी कुक्कुटपालन व्यवसाय व्यावसायिक दृष्टीकोनातून करून कुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक नफा मिळवावा, कौशल्य विकास  प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनी कौशल्य विकसित करावे असे प्रतिपादन डॉ. नरेश कापगते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जी.प. भंडारा यांनी केले ते कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) इथे आयोजित ग्रामीण युवकांना कौशल्य विकास  प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत कुक्कुटपालन या विषयावरील प्रशिक्षण समारोपीय कार्यक्रमात बोलत होते.

कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा , भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने धान शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण युवकांना कौशल्य विकास  प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत कुक्कुटपालन या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २३ ते २९ डिसेंबर २०२० या कालावधीत कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) इथे आयोजित करण्यात आलेले होते.

 सदर  समारोपीय कार्यक्रमाला डॉ. नरेश कापगते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जी.प. भंडारा, डॉ. एन. एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, श्री. प्रमोद पर्वते, विषय विषेतज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, साकोली, डॉ. प्रवीण खिरारी, विषय विषेतज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, साकोली, श्री. हेमंत बोरकर  व इतर अतिथी उपस्थित होते.

डॉ. एन. एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्व व आवश्यकता सांगून कुक्कुटपालन प्रशिक्षण च्या माध्यमातून आपला विकास साधावा तसेच सदर व्यवसायाची शेतीला जोड देऊन आर्थिक नफा आणि स्वताचा व्यवसाय सुरु करून इतर लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे सांगितले तसेच प्रशिक्षणार्थीना व्यवसायाकरिता शुभेच्छा दिल्या.

श्री. प्रमोद पर्वते, विषय विषेतज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना सदर प्रशिक्षण च्या माध्यमातून व्यवसाय सुरु करून आपला आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी असे सांगितले.

सदर  प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण युवकांना कौशल्य विकास  प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये  कुक्कुटपालनाचे महत्व व सध्यस्थीती, कुक्कुटपालन व्यवसायाकरिता लागणारे साहित्य, त्यांची ओळख, त्यांचा वापर कुक्कुटपालन प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता आवश्यक बाबी, कुक्कुटपालन व्यवस्थापन, कुक्कुटपालन घ्यावयाची काळजी, कुक्कुटपालन आहार व्यवस्थापन, कुक्कुटपालन निवारा व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन -लसीकरणाचे महत्व, होणारे आजार, लक्षणे व त्यावरील उपाय, पिल्लांची  घ्यावयाची काळजी, आहार व आरोग्य व्यवस्थापन, कुक्कुटपालन व्यवसायाकरिता उपयुक्त संकेतस्थळ, माहिती तंत्रद्यानाचा वापर, कुक्कुटपालन विषयक विविध योजना, कुक्कुटपालन विपणन व्यवस्थापन व अर्थशास्त्र व इतर विषयावरील माहिती देण्यात आली तसेच प्रगतशील कुक्कुटपालन शेतकऱ्यांकडे भेटी देऊन माहिती घेण्यात आली.  

कार्यक्रमाच्या शेवटी  प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. के. लाकडे, विषय विषेतज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, साकोली तर आभार प्रदर्शन श्री. वाय. आर . महल्ले, विषय विषेतज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. लयंत अनित्य, श्री. कपिल गायकवाड, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published.