जैतपुर येथे शेती दिन साजरा

कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत नुकतेच मौजा जैतपुर येथे परंपरागत कृषि विकास योजने अंतर्गत हरभरा पिकाचे शेती दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मौजा जैतपुर येथे या वर्षीच्या रबी हंगामात हरभरा पिकाचे पीक प्रात्यक्षिक देण्यात आले होते. व त्या अनुषंगाने ५० इच्छुक शेतकर्‍यांची निवड करून जैविक गटाची स्थापना करण्यात आलेली होती.  शेतकर्‍यांनी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशिनाशके व तननाशकांचा अतिरेकी वापर न करता  जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर शेतीमध्ये करावा हा या मागचा उद्देश्य होता. यासाठी निवड झालेल्या शेतकर्‍यांना हरभरा पिकाचे बियाणे तसेच वेळोवेळी विविध जैविक निविष्ठांचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बायोमिक्स, एच.ए.एन.पी.व्ही., ट्रायकोडर्मा, बायोइनोकुलंट, कामगंध सापळे इत्यादी निविष्ठांचा समावेश होता. या सर्व जैविक साधनांचा उपयोग करून जास्तीत जास्त व विषयुक्त उत्पादन घेता यावे यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या गरजेनुसार विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व बाबींचा तुलनात्मक निष्कर्ष काढण्याकरिता पीक काढणीला आले असतांना जैविक शेतीबद्दल शेतकर्‍यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आलेले होते. या प्रसंगी श्री. सूचित लाकडे, विषय विशेषज्ञ (उ|kनवि|k) यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की दिवसेंदिवस शेतीमध्ये रासायनिक घटकांच्या वाढत्या वापरामुळे जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे जमिनीमध्ये उपलब्ध असलेले सेंद्रिय कर्ब तसेच इतर अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे व जमिनीमध्ये विघटन न होणार्‍या क्षरांचे प्रमाण वाढले आहे व पर्यायाने जमिनी कडक होऊन  नापीक होत चालल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून भविष्यातील दुष्परिणामांना सामोरे जावयाचे नसल्यास सेंद्रिय शेती हा एकाच पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. येणार्‍या पिढीला रोगमुक्त व सुदृढ बनविण्यासाठी त्यांना विशमुक्त अन्न उपलब्ध करून देणे शेतकर्‍यांचेच कर्तव्य असून त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी लाभार्थी शेतकर्‍यांचे जैविक शेती विषयीचे व हरभरा पिकच्या जाकी-९२१८ या वाणाविषयी मनोगत घेण्यात आले. कार्यक्रमाला गावातील 45 शेतकरी उपस्थित होते.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *