शेतीच्या आधुनिकीकरणासाठी नवनवीन यंत्र अवजाऱ्यांच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी ”फार्म्स” अँप्सचा उपयोग करावा

भारत सरकारच्या कृषी एवंम कल्याण मंत्रालयाने ”फार्म्स” अँप्सचे नुकतेच उघाटन केले असून याच्या प्रचार प्रसिद्धीचे कार्य कृषि विज्ञान केंद्र यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.  जिल्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्र व अवजारे यांची  भाडेतत्वावर उपलब्धता व्हावी  हा फार्म्स अँपचा मुख्य उद्देश आहे. तसेच यामध्ये शेती करीता लागणारे नवीन यंत्र अवजारे याची खरेदी  किंवा विक्री याचीही तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी, वापरकर्ते, विक्रेते, भाडेतत्वावर कृषी अवजारांची देणारे किंवा घेणारे तसेच कृषी अवजारांसंबांधि अधिक माहितीकरिता या अँपचा वापर करता येईल. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी नवनवीन यंत्र अवजाऱ्यांच्या माहितीसाठी अशा अँप्सचा वापर करता येईल परंतु या करिता शेतकऱ्यांकडे एनरॉईड  मोबाइल असणे गरजेचे आहे. प्ले स्टोर वरून हा अँप डाउनलोड करून यामध्ये रजिस्ट्रेशन करावे. यानंतर त्यामध्ये मागितलेली सर्वे माहिती समाविष्ट करून आपल्याला याचा उपयोग घेता येईल. याच्या अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र साकोली भंडारा कडे संपर्क करावा. असे आव्हान कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक व विषय विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *