जागतिक मृदा दिन निमित्त जमीन आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण, शेतकरी मेळावा व प्रदर्शनीचे आयोजन

५ डिसेंबर जागतिक मृदा दिनाचे औचीत्य साधुन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला,अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र साकोली (भंडारा), कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, भंडारा व रिलायन्स फाउंन्डेशन माहिती सेवा, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय,  जमीन आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण, शेतकरी मेळावा व प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ५ डिसेंबर २०१८, दुपारी  १२.०० वा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पटांगण, सालेभाटा  ता. लाखनी  जि . भंडारा इथे करण्यात आलेले  आहे.

सदर कार्यक्रमाला उद्घाटक  मा. श्री. मधुकरजी  कुकडे , लोकसभा सदस्य , भंडारा-गोंदिया , अध्यक्ष  मा . श्री . डॉ . परिणय फुके , विधान परिषद सदस्य, भंडारा – गोंदिया , विशेष अतिथी मा , श्री. राजेश काशीवार, विधानसभा सदस्य , साकोली  प्रमुख अतिथी मा , डॉ .डी . एम .मानकर , संचालक, विस्तार शिक्षण , डॉ . पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, मा . श्री. हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, भंडारा, श्री. ज्ञानेश्वर रहांगडाले, जि. प. सदस्य, लाखोरी, सौ. मोरेश्वरी पटले, उपसभापती, पंचायत समिती, लाखनी, सौ. पुष्पलता सोनवाने, सरपंच, सालेभाटा, श्री. संतोष डाबरे, कृषि विकास अधिकारी, जि.प. भंडारा, श्री शेषराव निखाडे, कृषिभूषण शेतकरी, सेलोटी, डॉ. जि . आर. श्यामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, कृ. सं. केंद्र, साकोली व इतर मान्यवर अतिथी उपस्थित राहणार असून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सदर प्रसंगी मृदा आरोग्य मध्ये सेंद्रिय खतांचे महत्व या विषयावर डॉ .एन. एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र साकोली, मातीचा नमुना घेण्याची पद्धत यावर श्री. प्रमोद पर्वते, विषय विशेषज्ञ, कृषि विस्तार, माती परीक्षणाचे महत्व व फायदे, यावर श्री. योगेश महल्ले, विषय विशेषज्ञ, कृषि अभियांत्रिकी, जमिनीची आरोग्य पत्रिकेवर आधारित खत व्यवस्तापण  यावर   श्री. सूचित लाकडे, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, जमीन आरोग्य व्यवस्तापण यावर श्री. सुनील साबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, व डॉ. प्रवीण खिरारी, विषय विशेषज्ञ, पशु संवर्धन, माहिती देणार असून शेतकऱ्याकरिता कृषि प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी फिरती माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये मोफत माती तपासणी सुविधा उपलब्ध असून शेतकरयानी मातीचे नमुने योग्य पद्धतीने काढून सोबत आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, व जमीन गट नंबर घेऊन यावेत. तसेच सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संखेने शेतकरी बंधूनी हजर राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. एन . एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र साकोली यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *