खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा संपन्न

कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत मौजा मोहरी, तालुका – पवनी, जिल्हा – भंडारा इथे खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ०४ .०६.२०१९ रोजी करण्यात आले होते.  सदर खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा कार्यक्रमाला  मा. सौ. रेखा यशवंत लांजेवार, सरपंच, मोहरी, डॉ. एन . एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, श्री. प्रमोद पि. पर्वते, शात्रज्ञ, कृषि विस्तार, श्री. वाय. आर . महल्ले, शात्रज्ञ, कृषि अभियांत्रिकी, डॉ. प्रविण खिरारी, शात्रज्ञ, पशुसंवर्धन, श्री. सूचित लाकडे, शात्रज्ञ, उद्यानविद्या, श्री. कपिल गायकवाड, कार्यक्रम सहाय्यक , संगणक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, श्री. महेंद्र जांगळे आणि गावातील इतर शेतकरी बंधू तथा उमेद अंतर्गत गटातील महिला शेतकरी उपस्थित होते .

सदर खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा  कार्यक्रमात डॉ. एन . एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी उपस्थित शेतकऱ्यांना धान आणि तूर पिक लागवडीबाबत माहिती देऊन धान आणि तूर बीजप्रक्रिया प्रतेक्षात करून दाखवली, तसेच बीजप्रक्रिया बाबत संपूर्ण माहिती दिली, तसेच कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत घ्यावयाच्या पिक प्रात्यक्षिकांची माहिती देऊन उपस्थिताना कृषि माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले तसेच कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत असलेल्या शेतकरी सुविधा बाबत माहिती दिली.

श्री. प्रमोद पि. पर्वते, शात्रज्ञ, कृषि विस्तार, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत विकसित आणि पूर्व विदर्भासाठी शिफारस असलेल्या धान पिक विविध वाणांची माहिती देऊन, कृषि विज्ञान केंद्र, साकोली इथे वाण विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगितले, तसेच शेतकऱ्यांनी सदर धान पिक वाणांचा अवलंब करावा असे आवाहन केले, तसेच शेतकऱ्यांना विक्रीस उपलब्ध असलेल्या सोनबोरू, तूर, बायोमिस्क आणि इतर बाबतीत माहिती दिली .

श्री. वाय. आर . महल्ले, शात्रज्ञ, कृषि अभियांत्रिकी यांनी कृषि यांत्रिकीकरण बाबत माहिती दिली यामध्ये त्यांनी राईस ग्रेन प्लांटर, पावर वीडर, भात रोवणी यंत्र आणि इतर औजारे बाबत माहिती दिली तसेच शेती क्षेत्रात कृषि यांत्रिकीकरणाचे महत्व याबाबत माहिती देऊन आवत्या पद्धतीने धान रोवणी करिता आयोजित प्रात्यक्षिक करिता शेतकऱ्यांनी नियोजन करावे असे सांगितले.

डॉ. प्रविण खिरारी, शात्रज्ञ, पशुसंवर्धन  यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चारा पिक लागवडीबाबत माहिती दिली यामध्ये जयवंत, अझोला, नेपिअर आणि इतर चारा पिकांचा समावेश होता. श्री. सूचित लाकडे, शात्रज्ञ, उद्यानविद्या, यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड बाबत माहिती दिली तसेच फळपिक लागवड करावी असे आवाहन केले.

यावेळी गावातील आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद पि. पर्वते तर आभार प्रदर्शन श्री. सूचित लाकडे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री.  श्री. कपिल गायकवाड, कार्यक्रम सहाय्यक , संगणक, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, श्री. महेंद्र जांगळे, मोहरी, श्री. मुकेश सुखदेवे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *