दुग्धव्यवसायासाठी अँझोलाचा वापर प्रभावी

कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथे दि . १४ /०६/२०१९ रोजी उमेद च्या महिलांना प्रशिक्षण आणि प्तात्याक्षिक देण्यात आले . हा कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र साकोली आणि पंचायत समिती ,लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता .याकरीता उपस्थित सर्व कृषीसखी आणि पशुसखी यांना अँझोला लागवड प्रात्यक्षिक देण्यात आले.

कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील पशुसंवर्धन विशेषज्ञ डॉ.प्रविण खिरारी यांनी कृषीसखी आणि पशुसखी यांना आपल्या मार्गदर्शनामध्ये जनावरांच्या आहारामध्ये अँझोलाचा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. अँझोलामध्ये १५-२५ % प्रथिने असतात.जनावरांच्या खाद्यामध्ये अँझोलाचा वापर केल्याने दुधात वाढ होते. अँझोलाचा वापर शेळी.कोंबडी तसेच वराह यांच्या खादयात करता येतो.जेणेकरून बाजारातील महागडे पशुखादयाचे प्रमाण कमी करून त्यावरील होणाऱ्या खर्चामध्ये पशुपालकाला बचत करणे सहज शक्य होईल आणि दुधामध्येही वृद्धी होईल. तसेच त्यांनी अँझोलाचे उत्पादन आणि निर्मिती , अँझोला वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी , अँझोला लागवड व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक दिले. याकरिता सौ.सविता तिडके ,तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका-लाखनी आणि कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील सर्व अधिकारी उपस्थित होते.

 

Share:

Author: kvk-sakoli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *