धान पिकावरील गाद माशीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता वेळोवेळी शेतीची पाहणी करून वेळीच व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. उषा डोंगरवार आणि विषय तज्ञ (पिक संरक्षण) डॉ. प्रशांत उंबरकर यांच्या कडून करण्यात आले आहे.
गाद माशी, ही धान पिकावरील अतिशय महत्वाची आणि आर्थिक नुकसान करणारी किड आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
खालील प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करावे:
- गराडीची पाने १.५० टन प्रति हेक्टर या प्रमाणात चिखालणीचे वेळी शेतात टाकावी.
- सभोवतील पूरक वनस्पतींचा नाश करावा.
- किड ग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत.
- गाद माशी प्रवण क्षेत्रात रोवणी नंतर १० आणि ३० दिवसांनी तर इतर क्षेत्रात ५ टक्के चंदेरी पोंगे इतका प्रादुर्भाव आढळताच दाणेदार कार्बोफ्युरॉन ३ टक्के दाणेदार २५ कि. किंवा दाणेदार क्विनालफॉस ५ टक्के ५ किलो प्रति हेक्टरी बांधीमध्ये ७ ते १० से.मी. (२ ते ३ इंच) पाणी असतांना टाकावे. बांधितील पाणी चार दिवसापर्यंत बांधी बाहेर काढू नये.
- रासायनिक किटकनाशक वापरतांना सुरक्षेची सर्व काळजी घेऊनच वापर करावा.
- पुढील हंगामात गादमाशी प्रतिकारक धानाच्या जातींची उदा. साकोली-८, सिंदेवाही-२००१ व पी.के.व्ही. गणेश या वाणांची लागवड करावी.