केंद्र शासनाच्या विविध योजना या शेतकऱ्यांकरिता, गरजू लोकांकरिता तयार करण्यात आल्या असून या योजना गरिबांच्या कल्याणाकरिता असून, या योजनांचा लाभ सामान्य महिलांना सुद्धा झाला आहे, यामध्ये शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, गरजू महिलांना धूर आणि त्रास कमी होण्याकरिता उज्वला योजना, सौचालय सुविधा, पोषण अभियान, स्वच्छ भारत अभियान यांचेसह विविध योजना लाभदायक असून, यामधून बचत गटांना सक्षम करण्याकरिता विविध प्रयत्न केंद्र सरकार करत आहे, शेतकर्यांनी शेतीमध्ये विविध योजनाची लाभ घ्यावा असे प्रतिपादन मा. श्री. सुनीलजी मेंढे, खासदार, भंडारा –गोंदिया यांनी केले ते कृषी विज्ञान केंद्र, साकोली व उमेद साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” गरीब कल्यान सम्मेलन ” थेट प्रसार कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होऊन बोलत होते.
कृषी विज्ञान केंद्र, साकोली व उमेद साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने ” गरीब कल्यान सम्मेलन ” थेट प्रसार कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 31.05.2022 रोजी सकाळी 9.00 वाजता लहरीबाबा मठ सभागृह, साकोली इथे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाध्ये मा. प्रधानमंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी शेतक-याशी थेट संवाद साधला तसेच केंद्र सरकार संचालीत विवीध योजनांमधील विविध लाभार्थी सोबत संवाद साधला. सदर कार्यक्रमाचे थेट प्रसारण कार्यक्रम करण्यात आला.
सदर, कार्यक्रमाला मा. श्री. सुनीलजी मेंढे, खासदार, भंडारा –गोंदिया, मा. सौ. सरिताताई करंजेकर, उपसभापती, पंचायत समिती, साकोली, कृषिभूषण शेतकरी श्री. तानाजी गायधने, श्री. घनश्याम पारधी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, कृषि विज्ञान केंद्र साकोली चे मा. श्री. प्रमोद पर्वते, श्री. सागर ढवळे, तालुका कृषी अधिकारी, साकोली, मा. सौ. मनीषाताई काशीवार, साकोली, श्री. अश्विन बन्सोड, तालुका अभियान व्यवस्थापक, साकोली, श्री. स्वप्नील झंझाड, मंडळ कृषी अधिकारी, कु. छाया कापगते, कृषी अधिकारी, साकोली यांचेसह विवीध विभागांचे अधिकारी / कर्मचारी यांचे सह शेतकरी उपस्थीत होते तसेच उमेद अंतर्गत महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्थाविक मा. श्री. प्रमोद पर्वते, विषय विशेतज्ञ, कृषी विस्तार, कृषि विज्ञान केंद्र साकोली यांनी केले, त्यांनी प्रास्थाविक मार्गदर्शन मध्ये कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच कृषी विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत असलेल्या सुविधांची माहिती देऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत प्रसारीत धान पिकाचे विवीध वाणांची माहिती सांगितली.
मा. सौ. सरिताताई करंजेकर, उपसभापती, पंचायत समिती यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले, त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरावे जेणेकरून शेतीमध्ये आर्थिक फायदा मिळेल असे सांगितले. कृषिभूषण शेतकरी श्री. तानाजी गायधने यांनी उपस्थिताना मार्गदर्शनात शेंद्रीय शेती बाबतीत माहिती देऊन शेतकर्यांना विविध कृषी पुरस्कार बाबत माहिती देऊन, शेतकर्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करावेत असे सांगितले.
कार्यक्रम स्थळी खरीप हंगाम नियोजनाच्या दृष्टीकोनातून “कृषी प्रदर्शनी” चे आयोजन करण्यात आले होते. कृषी प्रदर्शनी मध्ये कृषि विज्ञान केंद्र साकोली, कृषी विभाग साकोली, आत्मा भंडारा, उमेद साकोली, महिला बचत गटाचे विविध स्टाल, कृषी औजारे कंपनी स्टाल यांनी सहभाग घेऊन विवीध विभागाचे तंत्रज्ञान प्रदर्शित केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत प्रसारीत धान पिकाचे विवीध वाण कृषी प्रदर्शनीमध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थिताना जेवण देण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वाय. आर. महल्ले, विषय विशेतज्ञ, कृषी अभियांत्रिकी तर आभार प्रदर्शन श्री. लयंत अनित्य, विषय विशेतज्ञ, हवामानशास्त्र, कृषि विज्ञान केंद्र साकोली यांनी केले. सदर कार्यक्रम हा मा. डॉ. उषा आर, डोंगरवार, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत उंभरकर, विषय विशेतज्ञ, किटकशास्त्र, श्री. कपिल गायकवाड, श्री. गणेश घुशिंगे, कु. आशा इडोळे, कु. प्रियंका जांभोळे, कु. बोरकर, श्री. सुखदेवे , श्री. संग्रामे, कृषि विज्ञान केंद्र साकोली यांनी सहकार्य केले.