परसटोला  येथे पी.एम. किसान सन्मान कार्यक्रम संपन्न

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा तर्फे दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पी.एम. किसान संमेलन कार्यक्रमाचे आयोजन परसटोला येथे करण्यात आले होते. याप्रसंगी सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाचे आयोजन डॉ. उषा डोंगरवार , वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा यांचे मार्गदर्शनाखाली  ग्रामपंचायत, परसटोला येथे करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. हरिश्चंद्र दोनोडे, सरपंच, ग्रामपंचायत परसटोला तसेच प्रमुख उपस्थितीत मान्यवर म्हणून सौ. केसर कांबळे, उपसरपंच, ग्रा.पं. परसटोला, श्री सागर ढवळे, तालुका कृषि अधिकारी, साकोली, श्री. मिलिंद मेश्राम, वरिष्ठ भात पैदासकार, कृषि संशोधन केंद्र, साकोली व त्यांचे चमू, श्री.वाय. एस. धुर्वे, ग्रामसेवक, ग्रा.पं.परसटोला, श्री. जंजाळ, मंडळ कृषि अधिकारी, साकोली, श्री. चौधरी सर, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद, परसटोला यांच्यासह एकूण ११९ महिला शेतकरी व शेतकरी वर्ग यांचा समावेश होता.

            मान्यवरांच्या हस्ते मा. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत उंबरकर, विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र) यांनी केले. यामध्ये त्यांनी सदर कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत  माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी  मा. प्रधानमंत्री, भारत सरकार यांचे शुभ हस्ते दिनांक २७ जुलै २०२३ रोजी राजस्थान मधील शिकर येथे आयोजित प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १४ वा हफ्ता हा देशातील ८.५ कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला.यात रु. १८००० कोटी पेक्षा जास्त रक्कम ही ऑनलाईन वितरीत करण्यात आली याचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत, परसटोला येथे करण्यात आली होती.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण खिरारी यांनी तर आभार प्रदर्शन कु.कांचन तायडे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील श्री.योगेश महल्ले, श्री. कपिल गायकवाड, श्री. मुकेश सुखदेवे, कु. आशा इढोळे, श्री. जागेश्वर संग्रामे तसेच इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले. तसेच परसटोला येथील ग्रामपंचायत कार्यलयामधील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *