निरोगी आरोग्यासाठी योग व प्राणायाम महत्वाचे

’जागतिक  योग दिवस’’ निमीत्त योग व  प्राणायाम कार्यक्रम संपन्न   

बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी जीवनात, निरोगी आरोग्यासाठी योग व प्राणायामाचे अनन्यसाधारण महत्व असून मानवी शरीराला दैनंदिन योग व प्राणायामची आवश्यकता आहे, मानवी शरीरस्वास्थ्य सुदृढ व निरोगी राहण्याकरिता नियमित प्राणायाम आवश्यक आहे, योग व प्राणायामचे महत्व लक्ष्यात घेता २१ जुन हा दिवस जागतिक स्तरावर “जागतिक योग दिवस” म्हणून साजरा केला जात आहे असे प्रतिपादन श्री. प्रमोद पर्वते, विषय विशेतज्ञ, कृषि विस्तार, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली च्या वतीने  ’जागतिक  योग  दिवस’ निमीत्त आयोजित योग व प्राणायाम कार्यक्रमात बोलत होते.

कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांच्या वतीने ’जागतिक  योग  दिवस’ निमीत्त आयोजित ‘योग व  प्राणायाम कार्यक्रम’ आदर्श गाव निर्मिती करिता निवड करण्यात आलेल्या मौजा पापडा खुर्द ता. साकोली, जी. भंडारा येथे   घेण्यात आला.

     सदर ’जागतिक  योग  दिवस’ निमीत्त आयोजित ‘योग व  प्राणायाम कार्यक्रम’ कार्यक्रमाला मा. श्री. हलीम खलील शेख, अध्यक्ष, गाव विकास समिती, पापडा, श्री. प्रमोद पर्वते, विषय विशेतज्ञ, कृषि विस्तार, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, श्री. वाय. आर . महल्ले, विषय विशेतज्ञ, कृषि अभियांत्रिकी, डॉ. प्रवीण खिरारी, विषय विशेतज्ञ, पशुसंवर्धन, डॉ. प्रशांत उंबरकर, विषय विशेतज्ञ, किटकशास्त्र, श्री. लयंत अनित्य, विषय विशेतज्ञ, हवामानशास्त्र, श्री. कपिल गायकवाड, कु. आशा इडोळे यांचेसह पापडा गावातील  गावकरी  उपस्थित होते.

सदर ‘योग व  प्राणायाम कार्यक्रम’ कार्यक्रमात डॉ. प्रशांत उंबरकर, विषय विशेतज्ञ, किटकशास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी कार्यक्रमाचे प्रास्थाविक करून उपस्थिताना जागतिक  योग दिनाचे महत्व व उद्देश सांगितले. तसेच उपस्थिताना विविध योग आणि प्राणायामामुळे होणारे फायदे सांगून विविध आसने करून दाखवली, यावेळी उपस्थितानी योग आणि प्राणायामाची विविध आसने करून योग दिवस साजरा केला.

डॉ. प्रवीण खिरारी, विषय विशेतज्ञ, पशुसंवर्धन यांनी उपस्थितांना योग आणि प्राणायामाची मानवी जीवनात होणारे महत्व तसेच निरोगी आरोग्याकरिता नियमित योग आणि प्राणायाम करण्याचे आवाहन केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश महल्ले  तर आभार प्रदर्शन श्री. लयंत अनित्य यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री. कपिल गायकवाड, श्री. मुकेश सुखदेवे, कु. आशा इडोळे, श्री. जागेश संग्रामे यांनी प्रयत्न केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *