धान महोत्सव, शिवार फेरी, शेतकरी मेळावा व कृषि प्रदर्शनी कार्यक्रम संपन्न

शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठातील नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे, शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून यशस्वी शेती करून दिशादर्शक म्हणून समाजात स्थान निर्माण करावे, ग्रामीण युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी शासकीय नौकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यामधून व्यावसायिक बनून आपला विकास साधावा, कृषि विभागातील कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्र, साकोली मधील उपलब्ध तंत्रध्यानाची माहिती घेऊन त्याचा अवलंब करून शेतीचा विकास साधावा, असे प्रतिपादन मा. श्री. राजेश काशीवार, विधान सभा सदस्य, साकोली यांनी केले, ते कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) इथे आयोजित “धान महोत्सव, शिवार फेरी, शेतकरी मेळावा, कृषि प्रदर्शनी व चर्चासत्र” कार्यक्रमात बोलत होते. 

कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा) इथे आज  दि. २५.१०.२०१८ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वा. पर्यंत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, कृषि व्यवस्तापन यंत्रणा (आत्मा), भंडारा, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, साकोली, रिलायन्स फौंडेशन माहिती सेवा, भंडारा, कोरोमंडळ फटीलायझर्स ग्रुप, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने “धान महोत्सव, शिवार फेरी, शेतकरी मेळावा, कृषि प्रदर्शनी व चर्चासत्राचे” आयोजन करण्यात आले होते.

            सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. श्री. राजेश काशीवार, विधान सभा सदस्य, साकोली, विशेष अतिथी म्हणून मा. डॉ. परिणय फुके, विधानपरिषद सदस्य, भंडारा-गोंदिया, प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, भंडारा, मा.श्री. शेषराव निखाडे, कृषिभूषन शेतकरी, लाखनी,मा. रामचंद्र कापगते, कृषिभूषन शेतकरी, खंडाळा,  मा. डॉ. जि.आर. श्यामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, कृषि संशोधन केंद्र, साकोली, मा. श्री. कवळूजी शांतलवार,प्रगतीशील शेतकरी, माडगी , मा. श्री. मिलींद लाड, उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा, कु. वंदना शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी, साकोली ,  मा. श्री. धम्मदीप गोंडाणे, सहा. कार्यक्रम अधिकारी , रिलायन्स फौंडेशन माहिती सेवा, भंडारा, मा. श्री. योगेश कापगते, कृषि शास्त्रज्ञ, कोरोमंडळ फटीलायझर्स ग्रुप, पुणे व जिल्ह्यातील जवळपास १२००-१३०० शेतकरी उपस्थित होते.

            यावेळी मा. श्री. हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, भंडारा, यांनी भंडारा जिल्ह्यातील धान पिकावरील तुडतुडा नियंत्रणाकरिता प्रभावी तंत्रज्ञान उपलब्धते करिता कृषि विज्ञान केंद्र आणि कृषि संशोधन केंद्र, साकोली यांचा मोलाचा वाटा असून शेतकऱ्यांनी धान शेतीमध्ये यांत्रिकीकरण गरज, धान पेरणी यंत्र, रीपरची काढणीकरिता वापर, पिक पद्धतीमध्ये बदलाची गरज यावर मागदर्शन करून शेतकर्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञनांशी सुसंवाद साधून तंत्रध्यानाच्या जोडीने उत्पन्न वाढउन आपला विकास साधावा असे आवाहन केले.

मा. डॉ. जि.आर. श्यामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, कृषि संशोधन केंद्र, साकोली, यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत विकसित धानाच्या विविध जाती व त्यांचे गुणधर्म याविषयी माहिती दिली. तसेच मा. श्री. धम्मदीप गोंडाणे, सहा. कार्यक्रम अधिकारी , रिलायन्स फौंडेशन माहिती सेवा, भंडारा, यांनी शेतकऱ्यांना मोबाईल संदेश द्वारे कृषि विषयक माहिती बद्दल माहिती दिली.

            सदर वेळी रब्बी हंगामातील पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याविषयावर डॉ. निलेश वझिरे, कृषि क्षेत्रात विविध मोबाईल अप्सचा वापर याविषयावर श्री. प्रमोद पर्वते, ओजारे वापर व महत्व याविषयावर श्री. योगेश महल्ले, कांदा पिक लागवड तंत्रज्ञान याविषयावर श्री. सूचित लाकडे, जणावराचा पशुखाद्यवरील खर्चात बचतीचे मार्ग या विषयावर डॉ. प्रवीण खिरारी या कृषि विज्ञान केंद्रातील  शास्त्रज्ञनांनी   मार्गदर्शन केले .

            सदर कार्यक्रमात धान पिकाचे विविध ५५-६० जाती/ वाण, प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष शेतात उभा मशीनने पेरलेला आवत्या धान, विविध ओजारे, आवत्या पेरणी मशीन, धानातील पेट्रोलवर चालणारे डवरण यंत्र, धान कापणी यंत्र, विविध तंत्रज्ञान, जनावरांचा पोषक चारा, शेळीच्या विविध जाती, कोंबडीच्या विविध जाती, धान पिक लागवडीच्या विविध पद्धती, कृषि प्रदर्शनी मध्ये विविध शासकीय/अशासकीय विभागांचे तंत्रज्ञान माहिती दालन, बचत गटांचे दालन, विविध कंपनीचे दालन च्या माध्यमातून माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध प्रकाशने, कृषिसंवादिनी, टायकोडर्मा, सुडोमोनस, बायोमिक्स, मोहरी बियाणे विक्री करण्यात आली. कृषि प्रदर्शनी मध्ये २५ दालन च्या माध्यमातून तंत्रध्यानाची  माहिती देण्यात आली.

            कृषि कार्यानुभव विद्यार्थी, कृषि महाविद्यालय नागपूर यांनी यावेळी “ तुडतुडा नियंत्रण, कीटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी आणि प्लास्टिक निर्मुलन” या विषयावर पाथनाट्य सादरीकरण केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद पर्वते, शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, साकोली तसेच आभार प्रदर्शन  श्री. सूचित लाकडे, शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले. कार्यक्रमाच्या यशश्वितेकरिता श्री. सुनील साबळे, श्री. कपिल गायकवाड, श्री. गणेश गुसिंगे , शिल्पा, गीता, झिंगरे व कृषि विज्ञान केंद्रातील  इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 7 =