डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा मार्फत ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता ग्राम पंचायत, परसटोला ता. साकोली येथे करण्यात आले आहे.
या ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमा मध्ये ऊस पिक लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक किड रोग व्यवस्थापन, एकात्मिक खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पाचट व खोडवा व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्रज्ञान ई. विषयावर सविस्तर माहिती मिळणार आहे. ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक डॉ. व्ही. के. बिरादर, प्रमुख, कृषि संशोधन केंद्र, तारसा, जि. नागपूर लाभणार आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाला मध्ये नवीन तंत्रज्ञाना विषयी माहिती घेऊन ऊस पिकासंदर्भात असलेल्या शंकांचे समाधान करून घेता येईल.
त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले आहे.