मान्सून पूर्व शेतकरी मेळावा व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा व कृषि संशोधन केंद्र, साकोली मार्फत दि. ०८/०६/२०२३ रोजी मान्सून पूर्व शेतकरी मेळावा व चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथे करण्यात आले होते. या मध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.श्री. नानाभाऊ पटोले, आमदार, साकोली विधानसभा क्षेत्र हे उपस्थित होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की वन्य प्राण्यामुळे होणारे शेतीचे नुकसान हि एक गंभीर समस्या असुन यावर ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. सध्या खरिप हंगाम सुरु असून बियाणे खरेदी करतांना काळजी घ्या जेणेकरून भविष्यात समस्या उद्दभवणार नाही. भंडारा जिल्ह्यातील शेतमाल जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करणे आवशक आहे तसेच शेतकरी सक्षम कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करावे जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना कोणत्याही बाबींसाठी इतर यंत्रणेवर अवलंबून राहावे लागणार नाही.या कार्यक्रमाला १२०० हून अधिक शेतकरी, महिला, युवक, उद्योजक, विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. श्री. नानाभाऊ पटोले, आमदार, साकोली विधानसभा क्षेत्र, मा. मदनजी रामटेके सभापती, जिल्हा परिषद, भंडारा,मा. डॉ.धनराज उंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, विशेष उपस्थिती मध्ये कृषिभूषण शेतकरी मा. श्री. तानाजी गायधने, शेतीनिष्ठ शेतकरी मा.श्री. घनश्याम पारधी तसेच मा. डॉ. विनोद नागदेवते,सहयोगी संशोधन संचालक, वि.कृ.सं.कें, सिंदेवाही, मा.श्री किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा, मा. श्रीमती. उर्मिला चिखले, प्रकल्प संचालक, आत्मा, भंडारामा.श्री.बी.व्ही. वैद्य माजी कृषी अधिकारी साकोली, श्री. ताराचंदजी लंजे अध्यक्ष शेतकरी शास्त्रज्ञ मंच कृषि विज्ञान केंद्र, साकोली, डॉ. मिलिंद मेश्राम, वरिष्ठ भात पैदासकार, कृ.सं.कें, साकोली, डॉ. उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृ.वि.के. साकोली, श्री. सागर ढवळे तालुका कृषि अधिकारी साकोली आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रथम चर्चासत्रामध्ये डॉ. मिलिंद मेश्राम, वरिष्ठ भात पैदासकार, कृ.सं.कें, साकोली यांनी डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला द्वारे विकसित सुधारित वाण या विषयावर व एकात्मिक पिक संरक्षण या विषयावर डॉ. प्रशांत उंबरकर, विषय तज्ञ (किटकशास्त्र), कृ.वि.के. साकोली, शेतीमध्ये विविध औजारांचा वापर यावर श्री. योगेश महल्ले, विषय तज्ञ (कृषि अभियांत्रिकी), कृ.वि.के. साकोली सर्वांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उषा आर. डोंगरवार यांनी केले. पौष्टिक तृणधान्य लागवड पध्दती बाबत सविस्तर मार्गदर्शन करून आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्याचा रोजच्या आहारात समावेश केल्याने आपले शरीर सृदृढ राहण्यात मदत होत असल्याचे सांगितले.
मा. डॉ.धनराज उंदिरवाडे यांनी मा. कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या १) शेतकरी शास्त्रज्ञ मंच २) डॉ. पं. दे. कृ. वि विक्री केंद्र ३) अकोला कृषी विद्यापीठ आयडॉल ४) मोडल विलेज (आदर्श गाव ) या चारही महत्वकांक्षी प्रकल्पाचे सविस्तर मार्दर्शन केले. विद्यापीठा द्वारे विकसित विविध तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर करवा असे सुचवले.
श्री. तानाजी गायधने यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळावे असे सांगितले तर मधमाशी पालन व्यवसाय सुरु करावा व त्याचे जतन करावे असे प्रतिपालन मा.श्री. घनश्याम पारधी यांनी केले. श्री. ताराचंदजी लंजे यांनी अकोला कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिक बदल करावा असे म्हटले. मा.श्री किशोर पात्रीकर यांनी बियाणे खरेदी करतांना घ्यावयाचे निकष यावर मार्गदर्शन केले. मा. डॉ. विनोद नागदेवते यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी चि. तन्मय लंजे याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तु देऊन करण्यात आला तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहितीचा QR कोड चे अनावरण सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कृषि प्रदर्शनीचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान वाणाचे बियाणे व जैविक खते व ट्रायकोडर्मा खरेदी केली. यावेळी डॉ. पं. दे. कृ. वि. अंतर्गत विकसित विविध धान वाणांचे बियाणे, बिजप्रक्रीयेसाठी जैविक खते, ट्रायकोडर्मा, कचरा व तनस कुजविणारे जीवाणू, कृषि संवादिनी व पुस्तके विक्रीस उपलब्ध होत्या.कृषि प्रदर्शनीमध्ये आत्मा, महिला बचत गट, व्ही. एन. आर. सीड्स, विदर्भ बाओटेक यवतमाळ यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा व कृषि संशोधन केंद्र, साकोली यांनी प्रयत्न केले.